Home महाराष्ट्र 'एक चार पाच सहा सात'; ज्येष्ठांच्या मदतीला आता हेल्पलाईन

‘एक चार पाच सहा सात’; ज्येष्ठांच्या मदतीला आता हेल्पलाईन

अमरावती

ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू होत असून, हेल्पलाईनचा क्रमांक १४५६७ (एक चार पाच सहा सात) आहे. ज्येष्ठ नागरिेकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र शासनाचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फौंडेशन व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ज्येष्ठांच्या आधाराला हेल्पलाईनची काठी

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी सोडविणे, त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे, तसेच त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे. टोल फ्री क्रमांक एक चार पाच सहा सात ही हेल्पलाईन सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत रोज सुरू राहील. केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे वगळता वर्षभर सेवा सुरू राहील, अशी माहिती जनसेवा फौंडेशनच्या क्षेत्रीय प्रतिनिधी मायावती वानखडे यांनी दिली.

हेल्पलाईनमार्फत आरोग्यविषयक जागरूकता, निदान, उपचार मिळवून देणे, निवारा, डे केअर सेंटर, पोषणविषयक, ज्येष्ठांसाठीची अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला व करमणूकीची माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे, कायदेविषयक मार्गदर्शन, विवादांचे निराकरण, पेन्शनसंबंधित मार्गदर्शन, मृत्यूपूर्वीचे आवश्यक दस्तऐवजीकरण व विविध शासकीय योजनांची माहितीही दिली जाणार आहे.

मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन

चिंता निराकरण, नातेसंबंध व जीवन व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताणतणाव, राग व्यवस्थापन, आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय प्रतिनिधीही नियुक्त करण्यात आले आहेत. या हेल्पलाईनबाबत अधिकाधिक जनजागृती करून ज्येष्ठांना हेल्पलाईनचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments