Home ताज्या घडामोडी अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत

अमरावती

अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका कारचे नियंत्रण सुटल्याने कर नदीच्या पात्रात कोसळली.वर्धा जिल्ह्यातील चिस्तूर गावाजवळ अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र ६ येथे हा अपघात झाला. या अपघातात चालकासह तिघे ठार झाले. शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
तळेगांव श्यामजीपंत च्या चिस्तुर गावाजवळ एका MH30 P 3214 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडीचा भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये तिघे जागीच ठार झाले तर एक जण आश्चर्यकारक वाचला आहे, मृतांमध्ये अमित गोयते वय 32 वर्ष रा.बडनेरा, शुभम गारोडे वय 25 वर्ष रा.अमरावती, आशिष माटे रा. राजुरा जि.
अमरावती, हे तिघे जागीच ठार झाले असून तर शुभम भोयर हा सुखरूप वाचला आहे, हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे ,तर एकाचा मृतदेह हा झाडावर अडकला होता तर दुसरा गाडीत अडकला होता तिसरा मृतदेह बाजूला पडून होता .पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असे सांगण्यात आले आहे.कारण मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे,श्याम गहाट,राहुल अमोने, अनील चिलघर, देवेंद्र गुजर,विजय उईके, रमेश परबत यांनी मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणी साठी पाठवले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments