Home ताज्या घडामोडी अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

पूरसंरक्षणासाठी विविध उपाययोजना; संरक्षक भिंतींची उभारणी करावी

अमरावती

मागील आठवड्यात दहीगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला. पुरामुळे गावालगत असलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानग्रस्तांना परिपूर्ण नुकसानभरपाई मिळवून द्यावी, तसेच पूरसंरक्षक भिंत उभारण्याची कार्यवाही तत्काळ करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव रेचा येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची व नुकसानग्रस्त संत्रा बागेची पाहणी केली व शेतकरी बांधव व ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार नरसय्या कोंडगुर्ले यांच्यासह ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. पंचनामा प्रक्रिया अचूक पद्धतीने पार पाडून आपदग्रस्तांना परिपूर्ण नुकसान भरपाई मिळवून द्यावी. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती वंचित राहता कामा नये असे निर्देश त्यांनी दिले.

त्या पुढे म्हणाल्या की, पूर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी पूरसंरक्षक भिंत उभारण्यात यावी, तसेच आवश्यक तिथे खोलीकरण आदी उपाययोजना राबवाव्यात. यावेळी पालकमंत्र्यांनी ग्रामस्थ बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे आदेश प्रशासनाला दिले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments