Home विदर्भ बग्गी येथील ३० वर्षीय युवकाचा विहीरात पडून मृत्यु

बग्गी येथील ३० वर्षीय युवकाचा विहीरात पडून मृत्यु

अमरावती

चांदूर रेल्वे तालुक्यातील व तळेगाव दशासर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बग्गी येथील एका ३० वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.१५ वाजताच्या दरम्यान घडली. सचिन विनोदराव खेकाडे (वय ३० वर्ष) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील बग्गी येथील शेतकरी सचिन विनोदराव खेकाडे हे स्वतःच्या शेतात सोयाबीन वर फवारणी करीत होते. यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार शेतात होता व काम करीत होता. अशातच फवारणी झाल्यानंतर ते विहिरीजवळ गेल्यानंतर त्यांना विहिरीच्या भितींवर एक झाड दिसले. सदर झाडे तोडण्यासाठी सचिन खेकाडे हे विहिरीच्या मधात उतरले व झाड तोडल्यानंतर वर येत असताना त्यांचा तोल जाऊन ते ७० ते ८० फूट खोल असलेल्या विहिरीत पडले. व ते परत आलेच नाही. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृतक सचिन खेकडे यांचे लग्न केवळ ३ ते ४ महिन्यांपूर्वीच झाले होते. त्यांच्या मागे आई-वडील, लहाण भाऊ, पत्नी असा परिवार आहे. दुपारी मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला व मृतदेह शवविच्छेदनात करिता चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. सायंकाळी शवविच्छेदन केल्यानंतर रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकाच्या अचानकच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments