Home ताज्या घडामोडी सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी

अमरावती

गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना जेवण देणाऱ्या नानक रोटी ट्रस्ट ला आज लोक फाउंडेशनच्या वतीने सोमेश्वर पुसदकर लोक गौरव पुरस्कार देण्यात आला. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहात माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित सोहळ्यात लोक फाउंडेशन हा पहिला पुरस्कार जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर राज्यमंत्री बच्चू कडू नागपूरच्या वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.

हजारो कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करणारा रसरशीत माणूस म्हणून ओळख असणाऱ्या सोमेश्वर पुसदकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लोक फाउंडेशन च्या वतीने लोक गौरव पुरस्कार बहाल करण्यात येतो. कौटुंबिक आणि भावनिक सोहळ्यात या पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी सोमेश्वर पुसदकर यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच राम रोटी ट्रस्टच्या अतुलनीय कार्याची प्रशंसा केली.

सोमेश्वर पुसतकरांमुळे नानक रोटीचे महत्व कळले : प्रा. बी.टी देशमुख

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा अजिबात नाही. यापैकी अन्न हीच खरी मूलभूत गरज आहे. तसे पाहता हवा, पाणी आणि अन्न या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. आज पाणी आणि हवा फुकट मिळते म्हणून त्याचे महत्व कमी आहे. भूक भागवणे ही ही अत्यंत महत्वाची गरज आहे. भुकेने व्याकुळ होणे फार कठीण आहे. आपल्या संत परंपरेत भुकेल्यांची भूक भगवा हे आवर्जून सांगितले आहे. अमरावती शहारत गत तीन वर्षांवसून भुकेल्यांना अन्नदान करणाऱ्या नानक रोटी संस्थेचे महत्व आज मला खळले. सोमेश्वर पुसतकर सारख्या व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार नानक रोटी या संस्थेला दिला जातो आहे याचा अभिमान वाटतो. सोमेश्वर पुसतकर यांच्यामुळेच आज या संस्थेची ओळख झाल्याचे प्रा. बी.टी. देशमुख म्हणले.

सोमेश्वर पुसतकर यांचे कार्य पुढे न्यायचे आहे :ना. याशीमती ठाकूर

हा सोहळा अतिशय भावनिक आहे या भावनिक सोहळ्यात नानक रोटी या संस्थेला सोमेश्वर पुसदकर यांच्या नावाने पहिला पुरस्कार दिला जातो आहे. सोमेश्वर पुसदकर यांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने अमरावती शहराला जिवंत रूप आणले. त्यांचे काम संपले नाही. सोमेश्वर पुसतकर यांची मुलगी आर्याचे डोळे सोमेश्वर पुसदकर यांच्या सारखेच आहे. यापुढे तुझ्या नजरेतून सोमेश्वर पुसदकर यांचा दृष्टिकोन समोर यायला हवा . संपूर्ण पुसदकर कुटुंबाने या दुःखातून आता सावरायला हवे अमरावतीला जिवंत ठेवणारी टीम तुमच्या पाठीशी आहे यामुळे आता डोळ्यात अश्रूंची गरज नाही आपली व्यक्ती दमा विनायचे दुःख असते मात्र त्यांच्या आठवणीत रडत राहिल्याने त्यांना दुखावल्या सारखे होईल. यामुळे यापुढे न रडता समाजकार्य धडक राहावे यासाठी आपण प्रयत्न करायला हवे,असा सल्ला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुसदकर कुटुंबीयांसह त्यांच्या मित्रपरिवाराला दिला.

सोमेश्वर पुसतकर कार्यकर्ता म्हणूनच जगले : ना. बच्चू कडू

सोमेश्वर पुसदकर यांची ताकद फार मोठी होती हा माणूस आमदार किंवा खासदार म्हणून मोठा झाला असता मात्र आयुष्यभर कार्यकर्ता राहून या व्यक्तीने आमदार किंवा खासदार यापेक्षाही मोठे नावलौकिक मिळवले असे राज्यमंत्री बच्चू कडू यावेळी म्हणाले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा सारख्या जगविख्यात संस्थेच्या सभागृहाला सोमेश्वर पुसदकर यांचे नाव दिले जाणे यावरून सोमेश्वर पुसदकर किती मौल्यवान व्यक्ती होते यावरून स्पष्ट होत असल्याचे बच्चू कडू यावेळी बोलले.

सोमेश्वर पुसदकर सारखा माणूस प्रत्येक जिल्ह्यात हवा : गिरीश गांधी

जबरदस्त प्रगल्भता पाण्याचा प्रश्न असो विदर्भाचा बॅकलॉग चा प्रश्न असो याची जाण असणारा जिंदादिल सतत धडपड करणारा कमिटमेंट चा पक्का असणारा सोमेश्वर पुसदकर हा समाजाचा प्रमुख होता असे भावोद्गार लोक फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी काढले. सोमेश्वर पुसदकर सारखा माणूस खरंतर प्रत्येक शहरात असायलाच हवा असेही गिरीश गांधी म्हणाले.

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहाला सोमेश्वर पुसदकर यांचे नाव: प्रभाकरराव वैद्य

आमच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात बाबासाहेब पुरंदरे यांचा कार्यक्रम असो किंवा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार सोहळा असो अशा विविध कार्यक्रमाच्या आयोजनाद्वारे आमच्या संस्थेला सामाजिक टच देणारा व्यक्ती म्हणजे सोमेश्वर पुसदकर होय. समाजासाठी काम करणारा हा पठ्ठा खरा मर्द माणूस होता. आज ज्या सभागृहात त्याच्या पुण्यतिथीनिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्या सभागृहात सोमेश्वर पुसतकर कर यांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले .या सभागृहाला आम्ही आजपर्यंत कोणाचे नाव दिले नव्हते. मात्र आज या सभागृहाला सोमेश्वर पुसदकर यांचे नाव आम्ही देणार अशी घोषणा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी यावेळी केली.

सोमेश्वर पुसदकर यांमधील चित्रफीत पाहून सभागृहातील साऱ्यांचेच डोळे पाणावले

सोमेश्वर पुसदकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणारी चित्रफित यावेळी सादर करण्यात आली रघुनाथ पांडे यांनी लिहिलेल्या आणि महेश सबनीस यांनी संकलित केलेली ही चित्रफीत पाहून सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या सोमेश्वर पुसतकर यांच्यासोबतच्या आठवणी जागृत झाल्या. सभागृहात उपस्थित प्रत्येकाचे डोळे यावेळी पाणावले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचलन लोक फाऊंडेशनचे सचिव अविनाश दुधे यांनी केले तर आभार वैभव दलाल यांनी व्यक्त केले. या सोहळ्याला सोमेश्वर पुसदकर यांचे कुटुंबीय तसेच माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, नगरसेवक दिनेश बुब, बबलू शेखावत, अभिनेता भारत गणेशपुरे ,बाळासाहेब कुलकर्णी ,अविनाश भडांगे, उमेश चौरसिया अनिल गडेकर ,निलेश लाठीया,विजय हरवानी, जभूषण पुसदकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप देशपांडे, बाबू बागडे, रघुनाथ पांडे, महेश सबनीस, रफिक भाई, चौधरी वैभव लांडे ,सुनील देशमुख, श्रीकांत खोरगडे,प्रा. गोविंद तीरमनवार, विकास अलोड, डॉ. प्रवीण रघुवंशी डॉ. अविनाश असणारे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments