Home ताज्या घडामोडी 31 लाखाचा गांजा जप्त; यवतमाळ वरून अमरावतीला येणारा ट्रक जप्त

31 लाखाचा गांजा जप्त; यवतमाळ वरून अमरावतीला येणारा ट्रक जप्त

अमरावती

तळेगाव दशासर पोलिसांनी नाकाबंदी करून 261 किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत 31 लाख रुपये इतकी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगावकडून अमरावती जिल्ह्यात ट्रक मधून हा गांजा येत असताना पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी संबंधित ट्रक जप्त केला आणि एका आरोपीलाही अटक केली.

यवतमाळमधून अमरावतीच्या दिशेने एका ट्रकमधून गाजांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ही तळेगाव दशासर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नाकाबंदी करून यवतमाळवरून देवगावकडे जाणाऱ्या संशयित ट्रकला थांबवले. यावेळी तपासणीदरम्यान एका ट्रकमधून 31 लाख रुपये किंमतीचा तब्बल 261 किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच 10 लाख किंमतीचा ट्रक ताब्यात घेऊन अमरावती येथील रहिवासी शेख हसन शेख कासम यास अटक केली. पोलीस अधीक्षक डॉ. हरी बलाज एन, अप्पर पोलीस अधीक्षक घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजय आखरे, सहायक पोलीस निरीक्षक बिरांजे, शिपाई संजय भोपळे, गजेंद्र ठाकरे, शाम गावंडे,मनीष आंधळे, संदेश चव्हाण,मनीष कांबळे, पवन महाजन, अमर काळे, सुनील महात्मे यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments