Home ताज्या घडामोडी अमरावती जिल्हा बॅंकेतील घोटाळा पूर्वनियोजित: आमदार प्रताप अडसड यांचा आरोप

अमरावती जिल्हा बॅंकेतील घोटाळा पूर्वनियोजित: आमदार प्रताप अडसड यांचा आरोप

अमरावती

ज्या बँकेतील कर्मचारी एक हजार रुपये देखील बँके च्या अध्यक्षांना किं वा ठराविक संचालकांना विचारल्याशिवाय वापरू शकत नाहीत, त्या बँके तील कर्मचारी सातशेकोटी रुपयांची गुंतवणूक कसे काय करू शकतात, असा सवाल करीत भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके तील म्युचूअल फं ड गुंतवणूक हा एक पूर्वनियोजित घोटाळा असल्याचा आरोप के ला आहे. हा एक प्रकारचा दरोडाच असून संबंधित संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही अडसड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना के ली.
प्रताप अडसड म्हणाले, पांढरे स्वच्छ कपडे घालून दिवसाढवळया शेतकºयांची, सर्वसामान्यांची बँक असलेल्या जिल्हा बँके वर दरोडा टाकण्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या व त्यापैकी पाच वर्षे कार्यकाळ संपल्यानंतर काळजीवाहू असलेल्या संचालक मंडळातील अध्यक्ष आणि काही संचालकांनी जिल्हा सहकारी बँके त अनेक गैरव्यवहार के ले आहेत. अलीकडच्या काळात उघडकीस आलेल्या म्युचूअल फं ड गुंतवणूक दलाली प्रकरणातून ते लक्षात आले आहे. के वळ हे एकमेव प्रकरण नसून सखोल चौकशी के ल्यास मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो.
गेल्या दहा वर्षांत बँके त अनेक नियमबाह््य कामे करण्यात आली. पात्र असूनही के वळ विरोधी पक्षाचा आहे, म्हणून अनेक शेतकºयांना हेतुपुरस्सर कर्ज नाकरण्यात आले. एकीकडे शेतकºयांना कर्जपुरवठा करताना हात आखडता घेतला जातो, मात्र दलाली मिळते म्हणून नियमबाह्य पद्धतीने बँके चे सातशे कोटी रुपये म्युचूअल फं डात गुंतवले जातात, हा ग्राहकांच्या पैशांचा दुरूपयोग आहे. या बँके वर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर कधी नव्हे, ते एवढया प्रमाणात शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न के ले. जवळपास दुप्पट कर्ज वाटप प्रशासकीय काळामध्ये करण्यात आले, असे अडसड म्हणाले.
म्युचूअल फं ड गुंतवणूक प्रकरणी काही कर्मचारी आणि दलालांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, पण ते पुरेसे नाही. या गैरव्यवहाराचे कर्तेधर्ते वेगळेच आहेत. या प्रकरणात भक्कम असे पुरावे चौकशी यंत्रणेच्या हाती लागल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक जण अटकपूर्व जामिनासाठी धावपळ करीत आहेत, असा दावा अडसड यांनी केला.

हा घोटाळा उघडकीस येऊ नये, यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे बँके चे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्याचा निर्णय चौकशी यंत्रणेने घेतला आहे. अनेक महत्वाची कागदपत्रे नष्ट करण्यात आली आहेत. पुरावे नष्ट करणे हा देखील कटाचाच भाग असून त्यासंदर्भात देखील आरोप निश्चित व्हावेत. संबंधित चौकशी यंत्रणेने पारदर्शक पद्धतीने काम करून या गैरव्यवहाराची पाळेमुळे खोदून काढावीत आणि खºया सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी केली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments