Home ताज्या घडामोडी कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

शेगाव

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे दीर्घ आजाराने आज बुधवारी (ता. 4 ऑगस्ट) निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती “मल्टीऑर्गन फेल्युअर “मुळे चिंताजनक होती. गेले दोन दिवसांत ती अधिक गंभीर झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नियोजनबद्ध कार्यपद्धती व शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशंकरभाऊंच्या नेतृत्वात श्रीगजानन महाराज संस्थानचा नावलौकिक संपूर्ण देशभर पसरला आहे. त्यांचे हे कार्य देशभरातील सर्व संस्थांना व्यवस्थापनशास्त्रातील मार्गदर्शक ठरणारी आहे.
राजकीय व्यक्तींमध्ये वरिष्ठांपर्यंत त्यांचे संबंध होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केला विकास आराखड्यात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाऊंचे मार्गदर्शन हे विकासाकरिता मैलाचा दगड ठरले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments