Home ताज्या घडामोडी जीवशास्त्र विभागास नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये पेटेन्ट मंजूर ...

जीवशास्त्र विभागास नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये पेटेन्ट मंजूर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नावलौकिकात भर

अमरावती
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील जीवतंत्रशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख तथा यु.जी.सी.-बी.एस.आर. फॅक्लटी प्रोफेसर डॉ. महेंद्रकुमार राय, त्याच विभागातील डॉ. अनिकेत गादे, डॉ. सुनिता बनसोड व कु. मनिषा बावस्कर या चमूच्या संशोधनाला नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये पेटेन्ट बहाल केले आहे. नॅनो टेक्नॉलॉजीमधील पेटेन्ट ‘अ न्यु मेथड विथ सेल्फ असेम्बल्ड सेल-पेनेट्रॅटिंग-अमिनो अॅसिड्स नॅनोपार्टिकल्स कॉम्प्लेक्सेस फॉर इंप्रूव्हड इलेक्ट्रोपोरेटिक डिलेव्हरी ऑफ न्युक्लेइक अॅसिड्स इन प्लॅन्टस’ असे या पेटेन्टचे शिर्षक आहे.

या पेटेन्टची उपयोगिता म्हणजे कृषी क्षेत्रात या अविष्कारामुळे अमुलाग्र बदल यामुळे होणार आहेत. विद्यापीठाच्या जीवतंत्रशास्त्र विभागाच्या चमूने केलेल्या या अविष्कारामुळे कृषी क्षेत्राचा कायापालट होण्यास महत्वाची दिशा मिळणार आहे. शेती पिकांमध्ये गोल्ड नॅनोपार्टिकल्सचा वापर करुन जीन ट्रान्सफर कशा पद्धतीने पिकांवर केल्या जाईल, यासंबंधी सविस्तर तंत्रज्ञान या अविष्कारामध्ये दिलेले आहे. या पेटेन्टमुळे शेती पिकांच्या उत्पादनात वाढ होणार असून जीवनसत्वामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आज पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव येत असल्यामुळे उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते, त्यामुळे शेतक­यांचे उत्पन्न सुद्धा घटते; पण या नवीन संशोधनामुळे पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव कमी होणार असून शेती पिकास रासायनिक खतांचा, उर्वरकांचा व बुरशीनाशकांचा उपयोग सुद्धा कमी होणार आहे. याशिवाय शेती खर्च कमी होणार आहे. जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये होत असल्यामुळे शेती उत्पादनात मोठ¬ा प्रमाणावर वाढ होणार आहे. वाढत्या लोकसंख्येस हव्या असलेल्या अन्नधान्य पुरवठ¬ामध्ये या संशोधनामुळे सक्षमता येणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या नॅनो मिशन कडून नॅनो मिशन स्कीम अंतर्गत बायो-टेक्नॉलॉजी विभागाला संशोधन प्रकल्प अनुदानासह प्राप्त झाला होता. सदर योजनेंतर्गत संशोधन करण्याकरिता मुख्य अन्वेषक म्हणून बायो-टेक्नॉलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख तथा यु.जी.सी.-बी.एस.आर. फॅक्लटी प्रोफेसर डॉ. महेंद्रकुमार राय यांची, तर सहायक अन्वेषक म्हणून डॉ. अनिकेत गादे यांची निवड झाली होती. याशिवाय संशोधन सहकारी म्हणून डॉ. सुनिता बनसोड व कु. मनिषा बावस्कर हे होते. या चमूने अतिशय परिश्रम करुन जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजीवर संशोधन करुन नॅनो टेक्नॉलॉजीमधील पेटेन्ट 2015 ला फाईल केले होते. सदर पेटेन्ट नुकतेच पेटेन्ट कार्यालयाकडून त्यांना मंजूर झाले आहे. बायो-टेक्नॉलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. महेंद्रकुमार राय, डॉ. अनिकेत गादे, डॉ. सुनिता बनसोड व कु. मनिषा बावस्कर यांचा पेटेन्ट मंजूर झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, बायो-टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगांवकर तसेच विद्यापीठ प्राधिकारणींचे सदस्य, शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments