Home ताज्या घडामोडी बापरे ! किडनीसाठी केले लग्न

बापरे ! किडनीसाठी केले लग्न

अमरावती

पत्नीच्या माहेरकडून चांगला हुंडा मिळावा, अडल्यानडल्याला सासर कामी पडावे, दुचाकी, चारचाकी मिळावी, शासकीय नौकरीसाठी सासर्याने मदत करावी, अशा अनेक हेतूने लग्न जुळविल्या जातात. मात्र ते हेतू साध्य न झाल्यास विवाहितांना शारिरिक मानसिक छळाला सामोरे जावे लागते. अशा नानाविध तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदविल्या जातात. मात्र वरूड पोलीस ठाण्यात एक अजबच तितकीच चिंतनिय तक्रार नोंदविण्यात आली आहे. ही तक्रार आहे चक्क किडणीबाबतची. पतीने किडणीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने पतीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविला असल्याची तक्रार पत्नीने जिल्ह्यातील वरुड पोलीस ठाण्यात किली आहे.

५ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास त्या पिडित विवाहितेने वरूड पोलीस ठाणे गाठून पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला. सागर रमेश दातीर (२९, रा. जरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, मारहाण, कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, आरोेपी व पिडिताचे मे २०१९ मध्ये लग्न झाले. आरोपी पतीला लग्नाआधीच किडणीचा आजार होता. त्याचे डायलिसीसही सुरू होते. मात्र पत्नीपासून त्याने ते दडवून ठेवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडिताने पतीला जाब विचारला. त्यावर तू मला किडणी द्यावी, म्हणूनच तुझ्याशी लग्न केले, असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे आरोपी पतीने आपल्याला शिवीगाळ करून मारहाण देखील केली, असे त्या विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. २१ मे २०१९ ते ५ फेब्रुवारी २९२० दरम्यान या घटना घडल्या. किडणीच्या कारणावरून पतीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालवल्याचे देखील पिडिताने पोलीस तक्रारीत म्हंटले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments