Home ताज्या घडामोडी पिकांचे अचूक क्षेत्र कळल्याने नियोजनासाठी मदत : जमाबंदी आयुक्त एन....

पिकांचे अचूक क्षेत्र कळल्याने नियोजनासाठी मदत : जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू

अमरावती

पीक पेरणीची माहिती गाव नमुना क्रमांक १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्टच्या मदतीने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. पीक पेरणी अहवालाचा ‘रियल टाइम क्रॉप डेटा’ संकलित होण्याच्या दृष्टीने व पारदर्शकतेसाठी हे उपयुक्त ठरणार असून, हा प्रकल्प 15 ऑगस्टपासून राज्यभर अंमलात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू यांनी आज येथे सांगितले.

ई पीक पाहणी प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा नियोजनभवनात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपायुक्त संजय पवार, प्रशिक्षक तथा सेलू (परभणी) येथील तहसीलदार बालाजी शेवाळे, आनंद कदम आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. सुधांशु म्हणाले की, पीक पेरणी अहवालाचा ‘रियल टाइम क्रॉप डेटा’ संकलित होण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग मिळवणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे यासाठी पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने हा ई-प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ई-पाहणीमुळे राज्यातील पिकांचे क्षेत्र अचूक कळल्याने आर्थिक पाहणी व कृषी नियोजनासाठी मदत होणार आहे.

गाव नमुना क्रमांक 7 हा अधिकार अभिलेख असून, गाव नमुना क्रमांक 12 हा पिकांची नोंद ठेवण्यासंदर्भात आहे. सध्या गाव नमुना 12 मध्ये पिकांच्या नोंदी तलाठी घेतात. ई पीक पाहणीत शेतकरी स्वतः पिकांची माहिती भरू शकतील. तलाठी ही माहिती तपासून घेतील. पीक पाहणी नोंदणीत शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल. पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. पीक कर्ज प्रक्रिया सुलभ होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई व मदत देणे शक्य होईल. सर्व अधिका-यांनी यातील तांत्रिक बाबी जाणून घ्याव्यात. हे ॲप शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी भरीव जनजागृती करावी, असे निर्देश श्री. सुधांशू यांनी दिले. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्याबरोबरच विभागीय व जिल्हास्तरीय संनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, पुणे येथे भूमी अभिलेख संचालकांच्या कार्यालयात पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचेही जमाबंदी आयुक्तांनी सांगितले. विभागातील सर्वच जिल्ह्यात या हंगामात पीक पाहणीसाठी या ॲपचा अधिकाधिक वापर व्हावा व गतीने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने अधिका-यांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनीही कार्यशाळेला मार्गदर्शन केले. *प्रायोगिक प्रकल्पात अचलपूर अग्रेसर*

प्रकल्पाचा पथदर्शी प्रकल्प राज्यात 20 तालुक्यात राबविण्यात आला. त्यात जिल्ह्यातील अचलपूरचा समावेश होता. प्रकल्प राबविताना आलेल्या अडचणी, त्रुटी, आवश्यक बदल आदींबाबत जमाबंदी आयुक्तांनी अधिका-यांकडून माहिती घेतली. अचलपूर टीमतर्फे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी माहिती दिली. सिंचन साधनांच्या नोंदीसह छायाचित्रे जोडण्याची सुविधा असावी, अशी सूचना प्रशिक्षणार्थ्यांकडून करण्यात आली. प्रायोगिक प्रकल्पांत अचलपूर अग्रेसर राहिल्याचे श्री. शेवाळे यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले यांनी सूत्रसंचालन केले

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments