Home ताज्या घडामोडी मेळघाट बँकांच्या शाखा वाढवा; खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

मेळघाट बँकांच्या शाखा वाढवा; खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागात नागरिकांना बँकेच्या छोट्या छोट्या कामासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागते परिणामी त्यांचा रोजगार बुडतो व त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो,म्हणून या भागातील चुरणी,धारणी व चिखलदरा येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या अतिरिक्त शाखा देऊन तेथील कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली.

खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मेळघाटातील अडचणी मांडल्या.
अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या भारत डायनॅमिक्स या मोठ्या प्रोजेक्ट साठी अर्थसंकल्पीय तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या कारखान्यामुळे किमान 1000 लोकांना रोजगार मिळेल,या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून आता प्रत्यक्ष उभारणी बाकी आहे हे ही खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या लक्षात आणून दिले.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जसे की संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना,पंतप्रधान आवास योजना, रोजगार हमी योजना, किसान कर्ज योजना आदींचे अनुदान-सहायता राशी किंवा कृषी कर्ज यासाठी लाभार्थ्यांना ,शेतकरी शेतमजुरांना बँकेवर अवलंबून राहावे लागते परन्तु बँकेतील कर्मचाऱ्यांच्या अपुरी संख्या आणि कर्मचाऱ्यांचे उद्धट वागणे यामुळे या गरीब-गरजू व जेष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो,दिवस दिवस रांगेत उभे राहावे लागते म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या बाबतीत जातीने लक्ष घालून अमरावती जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूर व वृद्ध,दिव्यांग नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुरेसे कर्मचारी आणि सौजन्यपूर्ण वागणूक यासाठी निर्देश द्यावे अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या सर्व मागण्या व्यवस्थित ऐकून त्यावर तातडीने सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन दिले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments