Home महाराष्ट्र विमा कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

विमा कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

अवकाश बोरसे यांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे मागणी

अमरावती

कृषीमंत्र्यांच्या अमरावती दौर्यामध्ये पिकविमा कंपन्यांची चांगलीच पोलखोल झाली, या दौर्यादरम्यान कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अमरावतीमधील पिकविमा कंपनीच्या कार्यालयास भेट दिला असता तिथे कार्यालय नसून फक्त गोडाऊन असल्याचा धक्कादायक प्रकार घडला तसेच संबंधित विनाकंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोनवरही कृषीमंत्र्यांना योग्य प्रतिसाद न दिल्याने संबंधित इफकोटोकीयो कंपनीवर कारवाईचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले होते. यासोबतच पिकविमा कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे त्यावेळी कृषीमंत्र्यांनी सांगितले होते.

दरम्यान या पिकविमा कंपन्यांवर कुठला गुन्हा दाखल करावा? याची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीतीच नव्हती, तज्ञ विधिज्ञांचा सल्ला घेऊनही संबंधित पिकविमा कंपन्यांची थातुरमातूर तक्रार करून प्रकरण थंड बस्त्यात घालणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही आता सखोल कारवाई करण्याची मागणी अवकाश बोरसे यांनी केली आहे.

पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीचा चुकीच्या पध्दतीने सर्व्हे केला, तसेच या कंपन्यांनी त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांनाच पिकविम्याचा लाभ मिळवून दिल्याचा आरोपही या निवेदनातून केला गेला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत संबंधित विनाकंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करणे गरजेचे असते, पण वेळेवर या कंपनीचे टोल फ्री क्रमांक बंद येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो आहे, याबाबत पुर्णानगर येथील शेतकरी उमेश महिंगे यांनी तालुका कृषी अधिकारी अमरावती तथा पुर्णानगर येथील तलाठ्यांकडे तक्रार करुनही त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, या प्रकरणाचे अर्ज निवेदनासोबत सादर करून या प्रकरणात कृषी विभागाचे अधिकारीच पिकविमा कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी या निवेदनातून अवकाश बोरसे यांनी अमरावतीचे उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे केली आहे. निवेदन देतेवेळी धनुभाऊ कोराटे, गजानन बोचे, उमेश महींगे, शेखर औगड, वैभव वानखडे, गिरीष डहाके, पंकज डहाके,

बॉक्स-
शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांमधील मुख्य दुवा म्हणून पिकविमा कंपनी कार्यरत आहे. परंतू या पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या पदरी आतापर्यंत फक्त निराशाच पडली आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही, त्यामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांची भुमिकासुध्दा संशयास्पद असल्याने या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कृषी विभागातील दोषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहीजे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments