Home ताज्या घडामोडी अमरावतीचे जनजीवन येणार पूर्वोदवर; यशोमती ठाकूर यांचा शासनाकडे प्रस्ताव

अमरावतीचे जनजीवन येणार पूर्वोदवर; यशोमती ठाकूर यांचा शासनाकडे प्रस्ताव

अमरावती

कोविडबाधितांची संख्या कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत लागू संचारबंदीत शिथीलता आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जनजीवन पूर्वपदावर येऊन उद्योग, व्यवसायांना चालना मिळावी यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यानुसार उपाहारगृहे, हॉटेल, बार, खानावळी आदी व्यवसायांनाही आठवड्याचे सातही दिवस रात्री 10 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली. कोविडबाधितांची संख्या घटल्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत काही शिथीलता आणून दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री 8 पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हॉटेल, उपाहारगृहे, खानावळींना सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत एकूण 50 टक्के आसन क्षमतेसह व दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत घरपोच सेवा पुरविण्याचे संचारबंदी आदेशात नमूद आहे. तथापि, मर्यादित वेळेमुळे हॉटेल, बार, उपाहारगृहाच्या व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. गत दीड वर्षांपासून सातत्याने अडथळे आहेत. या पार्श्वभूमीवर, तसेच रुग्णसंख्या कमी झालेली असल्याने हॉटेल, बार, उपाहारगृहांनाही रात्री खुले ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. त्याची दखल घेऊन या व्यवसायांनाही रात्रीपर्यंत खुले ठेवण्यास परवानगीबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिका-यांकडून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. *रुग्णसंख्या घटली* जिल्ह्यातील मागील आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा 0.32 व ऑक्सिजन बेडचा भरणा 1.62 आहे. गेल्या 2 महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या 5 ते 10 इतकीच आढळून येत आहे. जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. तिस-या लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. उद्योग, व्यवसायांचे नुकसान होऊ नये व जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी राज्य शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी गत दीड वर्षांपासून शासनाकडून अनेक पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यामुळे कोविडबाधितांची संख्या घटली आहे. लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. अनेक सेवा पूर्ववत सुरू होत आहेत. त्यानुसार हॉटेल, उपाहारगृहांनाही मुभा देण्यासाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे व लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जनजीवन पूर्वपदावर येत असताना कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेव्हिअर’चे पालन काटेकोरपणे करावे. कारवाईची वेळ येऊ नये. संयम आणि स्वयंशिस्तीतूनच आपण संभाव्य लाट रोखू शकू. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments