Home ताज्या घडामोडी आमसभेत मल्टिप्लेक्सवरून वादळी चर्चा 

आमसभेत मल्टिप्लेक्सवरून वादळी चर्चा 

अमरावती

नवाथे चौक येथील मल्टिप्लेक्स कॉम्प्लेक्स बांधण्यापूर्वी त्याबाबतचे नियोजन करण्यासाठी तज्ज्ञ समिती (पीएमसी) नेमण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने आज, मंगळवारी विशेष आमसभेत मंजुरीसाठी ठेवला होता.त्यावरून सभागृहात चांगलीच वादळी चर्चा झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.  

नवाथे येथील महापालिकेच्या जागेवर मल्टिप्लेक्स उभारण्याबाबत सन २००४ मध्येच सभागृहाने धोरण मंजूर करून कंत्राटही देण्यात आले; पुढे विविध कारणास्तव हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. आता पुन्हा त्याच धोरणानुसार बांधकाम कशा पद्धतीने करावे, हे ठरविण्यासाठी पीएमसी नेमण्याचा प्रस्ताव आयुक्त प्रशांत रोडे यांच्यावतीने सभागृहाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी भाजपा, बसपा गटनेता चेतन पवारी आदी विशेष आग्रही होते; परंतु या धोरणाला तब्ब्बल १७ वर्षे झाले असून, आता जमिनीच्या किमती, बांधकाम दरही वाढले आहे. त्यामुळे पीएमसी नेमण्यापूर्वी हा प्रस्ताव धोरणात्मक मंजुरीसाठी पुन्हा सभागृहात यावा, अशी मागणी काँग्रेस, एमआयएमच्यावतीनेही करण्यात आली. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही फक्त पीएमसीसाठी कोट्यवधींची रक्कम खर्च करण्यासाठी पैसा तुमच्या घरातून जाणार आहे का, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी केला. तसेच भविष्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल महापालिकेच्या विरोधात दिला, तर या सर्व आर्थिक नुकसानीची जबाबदारी आयुक्तांनाच घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. यादरम्यान मध्येच बोलल्याने बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रकाश बनसोड विरूद्ध तुषार भारतीय, सुनील काळे, अजय गोंडाणे यांच्यात शाब्दीक वादही झाला. सभागृहाच्या निर्णयाने न्यायालयाचा अवमान होईल, असा बागुलबुवा विरोधक करीत असल्याचा आरोप सुनील काळे, अजय गोंडाणेंनी केला. तसेच ही समिती स्वत: बांधकाम करणार नसून केवळ नियोजन करणार आहे. त्यामुळे विरोधकांनी भ्रम पसरवू नये, असा इशारा देताना तुषार भारतीयही रागाने लालबुंद झाले होत.े आयुक्तांनीही हा प्रस्ताव सर्व कायदेशीर बाजू तपासूनच आणला असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. त्याचवेळी आयुक्तांनी दिलेले गोलमाल उत्तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा विलास इंगोलेंनी दिला. अखेर या गदारोळातच पीएमसी नेमण्याचा प्रस्ताव मंजूर करून महापौर चेतन गावंडे यांनी या एकाच विषयावर आमसभा स्थगीत केली.  

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments