Home ताज्या घडामोडी अंबादेवी साखर कारखान्याची ईडी कडून चौकशी; अंजनगाव सुर्जीत खळबळ

अंबादेवी साखर कारखान्याची ईडी कडून चौकशी; अंजनगाव सुर्जीत खळबळ

अमरावती

अंजनगाव सुर्जी येथील अंबादेवी साखर कारखान्याच्या चौकशीकरिता ईडी ने कारखान्याचे कागदपत्र तपासणीसाठी घेतल्याने सुजी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

श्री अंबांदेवी साखर कारखान्याची कागदपत्रे मुंबई येथे इडीच्या हाती लागली असुन श्री अंबांदेवी कारख्यान्याची विक्री व्यव्हार अतीशय अल्प दरात झाल्याने इडी ह्या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

ईडी कडून अंजनगाव सुर्जी येथिल बंद पडलेल्या साखर करखान्याची ईडी कडून चौकशी होत आल्याची माहिती अंजनगाव शहरात पसरताच शहरातील नागरिक कारखान्यात पोहचले. मात्र तिथे कुणीच आले नसल्याचे आढळले .

साखर कारखाण्याची भव्य वास्तूचा परिसर १०५ एकरात पसरलेला आहे. २० वर्षापासून धुळ खात पडलेला हा कारखाना जर सुरु झाला असता तर अंजनगाव सुर्जी तालुकाच नव्हे तर आजुबाजुच्या तालुक्यातही एक वैभव निर्माण झाले असते असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments