Home ताज्या घडामोडी सुडाच्या भावनेतून तरुणाची हत्त्या; अमरावतीत खळबळ

सुडाच्या भावनेतून तरुणाची हत्त्या; अमरावतीत खळबळ

अमरावती

फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील यशोदा नगर गल्ली नम्बर 4 मधील सिध्दार्थ क्रिडा मैदानाजवळ गुरुवारी दुपारी 1.30 वाजता अनिकेत ज्ञानदीप कोकणे (18, रा. यशोदा नगर) या तरुणाची तिन जणांनी धारदार शस्त्रांनी हत्या केली.

अनिकेतने 2020 मध्ये बंटी बारसे नामक तरुणाची हत्या केल्याचा आरोप होता. या हत्येचा सुड उगविण्याच्या उद्देशाने अनिकेतची तिन जणांनी निर्घुण हत्या केल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे. एक महिन्यापूर्वी ढवलसरी येथे अनिकेतवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी तो बचावला. परंतु गुरुवारी दुपारी बासरे गटातील तिघांनी अनिकेत कोकणेची धारदार शस्त्रांनी सपासप वार करून, त्याची हत्या केली. या घटनेच्या माहितीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अनिकेतचे वडिल ज्ञानदिप कोकणे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला. याप्रकरणात पोलिस प्रशिक व विशाल या आरोपींचा शोध घेत होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments