Home ताज्या घडामोडी मोबाईलसाठी तगादा लावणाऱ्या पत्नीचा गळा आवळला

मोबाईलसाठी तगादा लावणाऱ्या पत्नीचा गळा आवळला

अमरावती
नवीन मोबाईलसाठी तगादा लावणार्या पत्नीची पतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास गोपालनगर स्थित आदर्शनगरात उघडकीस आली. पुजा विजय राठोड (22 ) असे मृत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी आरोपी पती विजय दादाराव राठोड (25) याला अटक केली आहे

सप्टेंबर 2020 मध्ये प्रेमविवाह झालेले राठोड दाम्पत्य आदर्शनगरातील संगिता यादव यांच्याकडे भाड्याने राहत होते. विजय राठोड हा वॉलमार्ट येथे सुरक्षा रक्षकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दोन दिवसांपूर्वी विजयची पत्नी पुजा हिचा मोबाईल फुटला. त्यामुळे तीने नवीन मोबाईलची मागणी पतीकडे केली. गुरुवारी दोघेही मोबाईल शॉपीमध्ये गेले. पुजाला 22 हजाराचा मोबाईल आवडला. परंतु तेवढे पैसे नसल्यामुळे मोबाईल नंतर घेऊ, असे विजयने पुजाला सांगितले. परंतु पुजाने नवीन मोबाईलचा हट्ट सुरुच ठेवला होता. दरम्यान नवीन मोबाईल घेण्यावरून दोघांचा पुन्हा वाद झाला. या वादात रागाच्या भरात विजयने पुजाच्या नाक्यावर जोरदार बुक्की मारून तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर विजयने थेट राजापेठ पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर ठाणेदार मनिष ठाकरे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पुजाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. त्यानंतर आरोपी विजय राठोडला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदविला. विजय हा मुळचा पोहरा देवी गावातील असून, पुजा ही वर्धा जिल्ह्यातील आर्वीची आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments