Home ताज्या घडामोडी महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा महाघोटाळा

महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा महाघोटाळा

खासदार राणा यांची स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार

अमरावती

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळ् झाल्याचा सनसनाटी आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रारही केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य महत्वाचे घटक मिळाले नसल्याने गत तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात असे दुर्दैवी वास्तव आल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी स्मृती इराणी यांना दिलेल्या पत्रात खेद व्यक्त केला आहे.

उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधूनउच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशन च्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेले आहे. कंझुमर फेडरेशन मार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या लक्षात आणून दिले व या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी 50% रकमेचा निधी समाविष्ट असतो आणि एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे व या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

आदिवासी माता किंवा नवजात शिशु यांच्यासाठी असणाऱ्या लोककल्याणकारी योजनेचा लाभ प्रत्यक्षात त्यांना न मिळता त्यांच्या वाटायचे पौष्टिक आहार संबंधित ब्लॅक लिस्टेड कंपनी व त्यांचे पाठीराखे हा मलिदा लाटत असून सखोल चौकशी झाल्यास हा महाभ्रष्टाचार 1000 ते 1500 कोटींचा असल्याचे सुद्धा निष्पन्न होऊ शकते अशी भीतीही खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या घोटाळ्याप्रकरणात एफआयआर नोंदविण्याचे आदेश द्यावेत व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील खासदार राणा यांनी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments