Home ताज्या घडामोडी महाराष्ट्रच्या राज्यपालांना भेटले आईआईएमसीचे महासंचालक

महाराष्ट्रच्या राज्यपालांना भेटले आईआईएमसीचे महासंचालक

संस्थेतील उपक्रमांची दिली माहिती

अमरावती

भारतीय जन संचार संस्थेचे महासंचालक प्रो. संजय द्विवेदी यानी शुक्रवार महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान त्यांनी राज्यपालांना संस्थे द्वारे चालविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आईआईएमसी ची शोध पत्रिका संचार माध्यम’ च्या ‘भारत में मीडिया शिक्षा के 100 वर्ष’ या विषयावर केंद्रित विशेषांकाची प्रत भेट केली.
प्रो. द्विवेदी यांनी आईआईएमसी च्या अमरावती केंद्रा विषयीही श्री कोश्यारी यांचे सोबत चर्चा केली.

आईआईएमसी देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित माध्यम शिक्षण संस्था असुन येथिल माजी विद्यार्थी माध्यम क्षेत्रात महत्वपूर्ण पदांवर कार्यरत असल्याचे राज्यपाल म्हणाले. अमरावती केद्राच्या माध्यमातुन संस्थेने मराठी पत्रकारितेच्या विकासात महत्वाचे योगदान दिले असल्याचे श्री कोश्यारी म्हणाले. त्यानी माध्यम शिक्षण व संशोधन क्षेत्रात केल्या गेलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांसाठी भारतीय जन संचार संस्थानआणि प्रा. द्विवेदी यांची प्रशंसा केली.

राज्यपाल म्हणाले, प्रो. द्विवेदी हे यशस्वी पत्रकार आणि लेखक असुन असे बौद्धिक योद्धा नव्या पीढ़ीच्या निर्माणात आपली भूमिका बजाऊ शकतात. प्रो. द्विवेदी यांना पत्रकारितेचा प्रदिर्घ अनुभव असुन ते ज्या संस्थेत राहिले तिला आपल्या कर्तव्यपरायणता आणि कर्मठतेने प्रगतिपथावर नेले आहे. ते पुढे म्हणाले, मागील एक वर्षात आईआईएमसीने जे उपक्रम राबविले ते देशतील अन्य माध्यम शिक्षण संस्था करीता एक उदाहरण ठरले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments