Home Video अमरावती- नरखेड मार्गावर मालगाडीचे 18 डबे रुळाखाली घसरले

अमरावती- नरखेड मार्गावर मालगाडीचे 18 डबे रुळाखाली घसरले

अमरावती

अमरावती – अमरावती-नरखेड मार्गावर पुसदा गावाच्या परिसरात भरधाव वेगात असणारी मालगाडी रुळावरून रात्री 12.45 मिनिटांनी घसरले. बल्लार्श येथून कोळसा भरून नरखेडकडे निघालेल्या 60 डब्यांच्या या गाडीचे 18 डबे रुळावर घसरून एकमेकांवर आढळले. या अपघातामुळे खळबळ उडाली.

 

बल्लार्श येथून कोळसा घेऊन निघालेली इंजिन क्रमांक 2380 आणि 23432 ही मालगाडी वालगाव स्थानकावर बराच वेळ थांबली होती. 12.30 वाजता सिग्नल मिळाल्यावर ही गाडी भरधाव वेगात चांदुरबाजारच्या दिशेने निघाली. दरम्यान, इंजिपासून पाचव्या ते बावीसव्या क्रमांकाचे डबे रुळखाली घसरले. यापैकी 7 डबे हे एकमेकांच्या वर चढले. मालगाडीचे चालक डी. एस. यादव यांनी अपघात होताच गाडीला कसेबसे सावरले. या गाडीत निर्मळ लोखंडे हे गार्ड म्हणून तैनात होते.

या मार्गावरून जाणाऱ्या नरखेड-भुसावळ पॅसेंजर आणि काचीगुडा एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आल्या. पहाटे चार वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. मनमाड आणि नरखेड येथून अपघात स्पेशल गाड्या अपघातस्थळी पोहोचल्या. चार जेसीबी अपघातस्थळी बोलविण्यात आले, पैकी एक जेसीबी सकाळी 8 वाजता पोचलो. मेळघाटातून 150 मजूर बोलविण्यात आले आहे. अपघातस्थळाजवळ जाण्यास सुरळीत मार्ग नसल्याने कामात काहीशा अडचणी येत आहेत. आज दिवसभरात हा मार्ग मोकळा करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. रेल्वे पोलिसांसह वालगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments