Home ताज्या घडामोडी आमदार देवेंद्र भुयार यांना कारावास;न्यायालयाने ठोठावली शिक्षा

आमदार देवेंद्र भुयार यांना कारावास;
न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अमरावती
वरुड येथील तत्कालीन तहसीलदाराला अर्वाच्च शिविगाळ व मारण्याची धमकी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी देवेंद्र महादेवराव भुयार यांना सोमवारी येथील जिल्हा न्यायालयाने तीन वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा सुनावली. त्यातील तीन महिने कारावासाची व 15 हजार दंडाची आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सर्वोच्च आहे. देवेंद्र सध्या मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार आहे.
दोषारोपत्रानुसार, घटनेच्या 27 फेब्रुवारी 2013 रोजी सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या यशोगाथचे काम सुरू होते. त्यावेळी देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेवून सभागृहात आले व तावातावाने जोरजोरात बोलू लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरा पर्यंत का बंद आहे व तुम्ही माझा फोन का काटला ? असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. दरम्यानच मला त्यांनी अर्वाच्च भाषेत आईवरुन शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली व माईक फेकून मारला, अशा आशयाची तक्रार वरूडचे तत्कालीन तहसीलदार राम लंके यांनी वरूड पोलिस ठाण्यात दिली होती. तक्रारीवरून देवेंद्र भुयार यांच्यावर भादंविच्या 353, 186, 294, 506 गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती दोषारोप पत्र 15 एप्रिल 2013 रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सदर्दू प्रकरणाचा तपास पीआय दिलीप पाटील यांनी केला. सुनावणीअंती जिल्हा न्यायालयातील न्यायालय क्रमांक 1 चे जिल्हा न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी देवेंद्र भुयार यांना सोमवारी कलम भादंवीच्या कलम 353 अन्वये तीन महिने सक्त मजूरी व रुपये 15 हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, तसेच भादंवीच्या कलम 294 अन्वये दोन महिने सक्त मजूरी व रुपये 10 हजार दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावास, भादंवीच्या कलम 506 अन्वये तीन महिने सक्त मजूरी व रुपये 15 हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदरच्या तीनही शिक्षा त्यांना एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. सदरची रक्कम वसुल झाल्यानंतर रुपये 10 हजार नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी राम लंके यांना देण्याचा आदेशही न्यायाधीशांनी दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुनित ज्ञानेश्वर घोडेस्वार यांनी यशस्वीरित्या युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून पवार यांनी काम पाहिले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments