Home ताज्या घडामोडी मोझरी येथे पालखी मार्गाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

मोझरी येथे पालखी मार्गाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अमरावती

मोझरी येथील पालखी मार्गाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे, तसेच ते विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

मोझरी येथील पालखी मार्ग बाजार ओटे ते दास टेकडी रस्त्यावर काँक्रीट व सुधारणा कामाचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेक मान्यवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, या मार्गाची सुधारणा होत असल्याने एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे. विहित वेळेत हे काम पूर्ण व्हावे. त्याचबरोबर, इतरही आवश्यक रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या कामासाठी ४४.८० लक्ष निधीला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता यापूर्वीच प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार मोझरी येथील बाजार ओटे व दास टेकडी मार्गावर काँक्रीट व वेरिंग कोर्स पूर्ण करण्यात येत आहे. ०००

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments