Home ताज्या घडामोडी प्रहारच्या सर्पमित्रांनी पकडला १२ फुटांचा अजगर

प्रहारच्या सर्पमित्रांनी पकडला १२ फुटांचा अजगर

अमरावती

प्रहार सर्पमित्र वन्यजीव संघटनेच्या सदस्यांनी बुधवारी बेलोरा गावातून एका अजगराची सुटका केली. मागील १५ दिवसात सर्पमित्रांनी दुसऱ्या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे

.बेलोरा गावातील ग्राम पंचायतीच्या पडीत जमिनीवर गावकरी आपल्या शेळ्या चराई साठी नेतात.आजूबाजूचा संपूर्ण परिसर घनदाट झाडाझुडपांनी व्याप्त असल्याने याठिकाणी एका १२ फुटांच्या अजगराने बकरीवर हल्ला केला. त्यानंतर या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाली आणि सर्पमित्रानी लगेच घटनास्थळी जाऊन अजगराला पकडले. त्यानंतर बडनेरा वनविभागाचे अधिकारी विनोद धावले यां उपस्थितीमध्ये या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी प्रहार सर्पमित्र वन्यजीव संघटनेचे राहुल वानखेडे,मंगेश चव्हाण, अभिषेक भाकरे, अनिकेत कदम, शैलेश झगडे आदी उपस्थित होते. पर्यावरणाच्या दृष्टीने अजगराचे फार महत्व आहे. साधारणपणे मादा अजगर जानेवारी ते मार्च या काळात अंडी देते. त्यानंतर आपल्या शरीराच्या गर्मीने अंडी उबवून ९० ते १०० दिवसांत पिल्लाना जन्म देते.आपल्या उष्णसंवेदनशील ग्रंथींमुळे अजगराला रात्रीच्या अंधारात देखील शिकार करण्यात कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत तर अन्नसाखळीत देखील अजगराचे महत्वाचे आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments