Home ताज्या घडामोडी अमरावती महापलीलेच्या आमसभेत युवास्वाभिमानच्या कार्यकऱ्यांचा गोंधळ

अमरावती महापलीलेच्या आमसभेत युवास्वाभिमानच्या कार्यकऱ्यांचा गोंधळ

अमरावती
अमरावती महापालिकेच्या आमसभेत आज युवस्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे शिरून गोंधळ घातला.

महापालिकेत कुशल आणि अकुशल कामगार पुरविण्याचा कंत्राट ईटकॉन या कंपनीला देण्यात आला आहे. दरम्यान या कंपनीकडून महापालिकेत काम टिकवून राहावे यासाठी कामगारांडून 25 हजार रुपये लाच मागण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत असे युवास्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांचे म्हणणे आहे. आमदार रवी राणा यांच्या निर्देशानुसार आम्ही या कंपनीच्या कार्यवरणालीबाबत आयुक्तांना अवगत करण्यासाठी आलो होतो. या कंपनीला कंत्राट देताना नगरसेवकांना आर्थिक लाभ झाला असल्याचा आरोपही जितू दुधाने यांनी केला. यामुळेच कार्यकर्त्यांनी सभागृहात जाऊन निषेध नोंदविला असे जितू दुधाने म्हणले. दरम्यान
महापालिकेच्या आमसभेत शिरून गदारोळ घालणे हे लोकशाहीला पोषक नसल्याने महापौर चेतन गावंडे हे या प्रकरची तक्रार घेऊन पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडे पोचले. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापुर कुसुम साहू, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, शिवसनेचे प्रशांत वानखडे, भाजपचे तुषार भारतीय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश बनसोड एआयएमएएमचे अब्दुल नाजीम आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments