Home ताज्या घडामोडी दर्यापूरच्या हवाई सुंदरीची लक्षवेधी कामगिरीअफगाणिस्थानातून भारतीयांना आणण्यात सहभाग

दर्यापूरच्या हवाई सुंदरीची लक्षवेधी कामगिरी
अफगाणिस्थानातून भारतीयांना आणण्यात सहभाग

अमरावती
आपल्या जीवाची बाजी लावत अफगाणिस्थानमधून भारतीयांना आपल्या देशात सुखरूप आणण्यासाठी इंडियन एअर लाईन्सने पाठविलेल्या विमानात दर्यापूर मधील हवाई सुंदरीचा सहभाग आहे. श्वेता चंद्रकांत शंके असे हवाई सुंदरीचे नाव असून ती दर्यापूरमधील बाभळी येथे शिवाजी चौकामधील रहिवासी आहे. तिचे वडील जिल्हा परिषदेच शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. बहीण दर्यापुरातच दंतरोग तज्ञ आहे व भाऊ फार्मासिस्ट आहे.

सन 17-18 मध्ये तिची निवड हवाई सुंदरीकरिता झाली. प्राथमिक प्रशिक्षण संपल्यावर इंडियन एअरलाईनमध्ये कार्यरत झाली. सध्या ती दिल्ली येथे तैनात आहे. भारतातील दूतावासात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसह अफगाणिस्थानात अडकलेल्या 129 भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे एक विशेष विमान भारतात यशस्वीपणे दाखल झाले. एआय 244 या विमानाने काबूल विमानतळाहून अतिशय बिकट परिस्थिती असतानासुद्धा उड्डाण घेतले. या विमानात दर्यापूरची हवाई सुंदरी श्वेता चंद्रकांत शंके ही सहभागी होती. श्वेता शंके ही बनोसा भागातील साई आय केअर मल्टीस्पेशलिटी डेंटल केअरचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांची साळी आहे. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळली. अफगणिस्थानामधील स्फोटक स्थिती बघता आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करणे, तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करणे या एकमेव ध्येयातून सर्वच कामी लागले होते. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रसंगी प्राण गेले तरी चालेल ही ऊर्मी बाळगत कार्य करण्यात आले. या मिशनमध्ये सुमारे 129 भारतीयांना मायदेशी आणण्यात यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सहभागी असणार्‍या श्वेताचे व तिच्या परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेतासोबत भ्रमणध्वनिवरून संवाद साधला आणि तिला शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments