Home ताज्या घडामोडी 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर कालावधीत ‘सामाजिक ऐक्य पंधरवाडा’

20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर कालावधीत ‘सामाजिक ऐक्य पंधरवाडा’

अमरावती

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने केंद्रिय युवा व क्रिडा मंत्रालयाव्दारे सद्भावना दिवस आणि केंद्रिय मानव संसाधन विकास मंत्रालयाव्दारे 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर हा पंधरवाडा ‘सामाजिक ऐक्य पंधरवाडा’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन राज्य शासनाने दोन्ही प्रसंग साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेंकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृंध्दीगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवाडा साजराकरण्यामागे आहेत._ कोविड-19 विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. महसूल विभागाने लाऊड स्पिकरमार्फत सद्भभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे सूचविण्यात आले असूनअधिकारी-कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतराचे पालन करुन सद्भभावना दिवसाची प्रतिज्ञा घ्यावी. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सद्भभावना शर्यतीचे आयोजन करु नये. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता, सद्भभावना दिवसाचा कार्यक्रम सामाजिक अंतर, सर्वांनी मास्क वापरावे. नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे आयोजन करावे. विद्यापीठे, महाविद्यालये व शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून संवाद किंवा मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रख्यात स्वातंत्र्य सैनिकांना भाषणासाठी निमंत्रित करावे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन ऑनलाईन वेबिनार, संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून सद्भभावना दिवस व सामाजिक ऐक्य पंधरवाडा साजरा करण्याच्या सूचना शासनाव्दारे देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments