Home ताज्या घडामोडी डॉ. नीरज मुरके "महाराष्ट्र जन - गौरव " पुरस्काराने सन्मानित

डॉ. नीरज मुरके “महाराष्ट्र जन – गौरव ” पुरस्काराने सन्मानित

मुंबई

अमरावती येथील सुप्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ञ डॉ. नीरज मुरके यांचा राजभवनात महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .
मुम्बई येथील सपना सुबोध सावजी ट्रस्ट तर्फे घोषित या परितोषिकात राज्यातील विविध क्षेत्रातिल सुमारे ३५ नागरिकांचा सत्कार करण्यात आला .सपना सुबोध सावजी ट्रस्ट तर्फे विविध सामाजिक उपक्रम केले जातात ,त्यात प्रामुख्याने मोफत शिक्षण , मोफत वैद्यकीय सेवा , मोफत रक्त पेढी , वृक्षारोपण , गरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वितरण , सामाजिक बांधिलकी साठी विविध कार्यक्रम राबविले जातात . या ट्रस्ट चे संचालक माजी राज्यमंत्री श्री सुबोध सावजी , मुम्बई येथील सुप्रसिद्ध क्ष – किरण तज्ञ डॉ. राहुल सावजी तसेच श्री केतन तुबेक़री हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते .
डॉ. नीरज मुरके यांनी अमरावती येथे सुमारे २०० संघाटनांना एकत्र करून ” बेटी बचाव ग्रुप ” ची स्थापना केली . गेली ५ वर्ष ह्या संघटने तर्फे बेटी बचाओ जनजागृति साठी जागतिक महिला दिनी एक भव्य रैली चे आयोजन करण्यात येते . या रैली द्वारा सामाजिक बांधिलकी चे उत्कृष्ट उदाहरण दिल्या जाते .बेटी बचाव संघटने द्वारा वेळो वेळी मुलींच्या अधिकारासाठी लढ़ा दिला जातो .
हेच नव्हे तर डॉ. नीरज मुरके यांनी वृक्षारोपण जनजागृति निमित्त केलेल्या कामाची नोंद देखील घेण्यात आली . कोरोना काळात डॉ. नीरज मुरके यांनी विविध प्रसार माध्यमातून जनजागृती चे महत्वपूर्ण कार्य देखील केले . अमरावती महानगर पालिका तसेच आय.एम. ए अमरावती च्या संयुक्त विद्यमाने लोक जागृती साठी देखील डॉ. मुरके यांनी वेबिनार घेऊन पुढाकार घेतला .
म्यूकोरमायंकोसिस ने त्रस्त रुग्नांवर डॉ. मुरके यांनी अत्यल्प दरात आपली सेवा दिली . आपल्या दवाखान्यात मोफत मास्क ,वैक्सीन जनजागृतीसाठी वृत्तपत्रात लेख देऊन त्यांनी मोलाचे सहकार्य केले .
भाजी बाज़ार येथील दवाखान्यात ते आज ही गरीब रुग्णांना आपली सेवा देत आहे .
अवयव दान जनजागृती साठी डॉ. नीरज मुरके यांनी अमरावती येथे आय. एम. ए च्या सौजन्याने मैराथॉन घेतली ज्यात हजारो धावकांनी भाग घेतला होता .
आय. एम. ए, अमरावती चे सचिव असताना केलेल्या विविध लोकउपयोगी कामाची नोंद घेऊन डॉ. नीरज मुरके यांना राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर सर्वोत्कृष्ट सचीव म्हणून मान देण्यात आले .तसेच अमरावती च्या आय. एम. ए शाखेला देखील राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर सर्वोत्कृष्ट शाखेचा मान मिळाला .
डॉ. नीरज मुरके सोबत महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन , पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता , प्रसिद्ध गायक श्री सुदेश भोसले , टी. वि फेम रवि दुबे , क्राइम पेट्रोल फेम अनूप सोनी , भारतीय हॉकी पटु मरविन फ़र्नान्डिस , सुप्रसिद्ध कुश्ती पटु व अजूबा अवार्ड ने सन्मानित संग्रामसिंह ,साई धाम हॉस्पिटल चे डॉ. स्वप्निल माने , महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स चे डॉ. राहुल पंडित ,यवतमाळ येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. वृषाली माने ,फोर्टिस हॉस्पिटल चे बालरोग तज्ञ डॉ. समीर सदावर्ते , भारतीय सेना येथे सेवा देणारे डॉ. राजेश अढ़ाऊ , डॉ. हुजैफा खोराकिवाला , डॉ. कमल जांगिड़ , एड. रुबीना अख्तर हसन रिज़वी , श्री गोवर्धन शर्मा , श्री गोपीकिसन बाजोरिया ,डॉ. जी. पी. रत्नपारखी ,डॉ. दीपक पाटकर ,इत्यादि मान्यवारांचा देखील राज्यपाल साहेबांनी सत्कार केला . राज्यपाल श्री कोशियारी यांनी डॉ. नीरज मुरके यांनी केलेल्या विविध कार्याचा विशेष उल्लेख केला .
समाज कार्यात सदैव पुढे असणाऱ्या डॉ. नीरज मुरके यांना महाराष्ट्र जन – गौरव पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरावरुन त्यांचे कौतुक करण्यात येत आहे . डॉ. मुरके यांनी त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा साठी सदैव प्रेरणा देणाऱ्या त्यांचे वडील डॉ. नंदकिशोर मुरके ,आई डॉ. सुशीला ,पत्नी डॉ. पल्लवी ,नूपुर, सुहानी ,त्यांचे सहकारी , सर्व सहकारी संस्था , मित्र तसेच आए. एम. ए चे सर्व सदस्य यांचे आभार मानले व महाराष्ट्र जन -गौरव पुरस्कार हे प्रत्येक अमरावतीकराचा सत्कार आहे असे सांगितले .

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments