Home ताज्या घडामोडी बोराळा येथे रक्तदान शिबिर

बोराळा येथे रक्तदान शिबिर

दर्यापुर
सध्याच्या काळात अत्यावश्‍यक असणाऱ्या रक्ताची उपलब्धता करण्यासाठी बोराळा गावात युवकांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत प्रथमच रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल उपस्थितांनी युवकांचे कौतुक केले. या शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान करून राष्ट्रहितासाठी योगदान दिले. ‘रक्तदान शिबिर संयोजकांमुळे समाज सुंदर होत आहे. त्यांच्यातून कार्यकर्त्यांची भावी पिढी घडणार आहे. दुसऱ्यासाठी जगणे, हेच खरे जगणे आहे. हे बोराळा गावातील युवकांनी दाखवून दिले.
शिबिराच्या आयोजनकरिता सूरज पाटील, संजय निशाने, जितेंद्र कळस्कर, विशाल निंबाळकर, कौस्तुभ जीवने, चेतन वसु, स्वप्निल सगने, गौरव टाले, निखिल, धोटे, नीलेश गवई, सचिन श्रीवास, चेतन करूले, संदीप निंबाळकर, सतीश भेले, सचिन टिपले, भास्कर इंगळे, आवेज मिर्झा, रविदास चव्हाण, ऋषिकेश कडू, हरीश कुकलकर, सात्विक कुकलकर,निशांत जीवने, अक्षय कडू यांनी रक्तदान करून परिश्रम घेतले. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमुने रक्तसंकलन केले.

वैश्विक समाजाची संकल्पना दृढ
रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. शिबिरातील सर्व संयोजक तरुण असून आमच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, असा आहे. आमचे कार्य पाहून देवालाही आपणाला जन्म दिल्याचा अभिमान असेल’ अशी ग्वाही बोराळा गावातील युवकांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments