Home क्रीडा एकलव्य अकादमीच्या गुणवंत खेळाडूंचा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव

एकलव्य अकादमीच्या गुणवंत खेळाडूंचा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव

अमरावती

पोलंड येथे झालेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा गौरव महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला.

नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोणे हिने पोलंड येथे झालेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल प्राप्त केल्यामुळे तिचा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. साक्षी तोटे, एकलव्य गुरुकुलचे मुख्याध्यापक विलास मारोटकर, भारतीय संघाचे कोच अमर जाधव व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव गुरुजी यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकलव्य क्रीडा अकादमीतर्फे यापुढेही असेच गुणवंत खेळाडू घडावेत व अमरावती जिल्हा, महाराष्ट्र व देशाचे नाव जागतिक स्तरावर अधिकाधिक उज्ज्वल होवो, अशा शुभेच्छा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

०००

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments