Home ताज्या घडामोडी अमरावती शिवसैनिकांचा भाजप कार्यालयावर हल्ला

अमरावती शिवसैनिकांचा भाजप कार्यालयावर हल्ला

अमरावती

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यभर पडसाद उमटत असतांत अमरावती शिवसैनिकांनी भाजपच्या कऱ्याल्यावर हल्ला करून जाळपोळ केली.

युवासेनेचे जिल्हा प्रमुख पराग गुढदे यांच्या नेत्रीत्वात शेकडो शिवसैनिक राजपेठ परिसरातील भाजप कार्यालयावर सकळी 10.30 वाजेच्या सुमारास हल्ला केला. यावेळी भाजप आणि भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. कार्यालयावर असणाऱ्या पक्षाच्या नावावर काळी शाई फासण्यात आलो तसेच कार्यालयाबाहेर असणारे फलक जाळण्यात आले. दगड आणि काठ्या मारून कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या.

भाजप कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली. घटनेनंतर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालयात पोचले. राजपेठ पोलीसही भाजप कार्यालयात पोचले. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने हलकेखोर शिवसैनिकांचा शोध घेणे सुरू केले आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण होणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments