Home ताज्या घडामोडी ई- पीक पाहणी प्रात्यक्षिकात जिल्हाधिका-यांचा प्रत्यक्ष सहभाग

ई- पीक पाहणी प्रात्यक्षिकात जिल्हाधिका-यांचा प्रत्यक्ष सहभाग

अमरावती

विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजनासाठी ई- पीक पाहणी उपयुक्त ठरणार असून, ही प्रक्रिया गतीने राबवावी व शेतकरी बांधवांचा सहभाग मिळवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले. अचलपूर तालुक्यातील नरसाळा येथे भेट देऊन जिल्हाधिका-यांनी स्वत: या प्रक्रियेत सहभागी होऊन प्रत्येक बाबीची माहिती घेतली व अधिकारी-कर्मचारी, शेतकरी बांधव यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, मंडळ अधिकारी अनिल पोटे, तलाठी जगदीश पानसे आदी यावेळी उपस्थित होते. ई- पीक पाहणी प्रकल्प प्रायोगिक तत्वावर अचलपूर तालुक्यात सर्वप्रथम राबविण्यात आला. आता तो जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. पीक पेरणी अहवालाचा 'रियल टाइम क्रॉप डेटा' संकलित होण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग मिळवणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे यासाठी पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने हा ई-प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. ई-पाहणीमुळे राज्यातील पिकांचे क्षेत्र अचूक कळल्याने आर्थिक पाहणी व कृषी नियोजनासाठी मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत सहभाग वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले. *पुनर्वसित गावांची पाहणी* दौ-यादरम्यान जिल्हाधिका-यांनी चांदूर बाजार तालुक्यातील मोजखेडा व अचलपूर तालुक्यातील वडुरा येथील पुनर्वसित वस्तीचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याची टाकी आदी कामांबाबत आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी तालुका प्रशासनाला दिले.

,

000

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments