Home ताज्या घडामोडी पोहरा आरोग्य उपकेंद्र चमूच्या प्रयत्नांनी कमी वजनाच्या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा

पोहरा आरोग्य उपकेंद्र चमूच्या प्रयत्नांनी कमी वजनाच्या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा

अमरावती

अवघे १ किलो ९०० ग्रॅम वजन, त्यात लघवीच्या ठिकाणी दुखरा अल्सर, ताप अशा अवस्थेतील बालिकेवर योग्य उपचार, पालकांचे समुपदेशन, पाठपुरावा यामुळे पोहरा आरोग्य उपकेंद्रातील कर्मचा-यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा झाली असून, तिचे वजन सुमारे अडीच किलो झाले व ती सुखरूप आहे._ अंजनगांव बारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पोहरा उपकेंद्रातील राजुरा येथील पारधी बेडा याठिकाणी वृषाली पवार या मातेस प्रसूतीसाठी संदर्भित करण्यात आले. पोह-याचे डॉ. मंगेश पाटील यांनी बेड्यावर जाऊन नियमित गृहभेटी करुन संस्थात्मक प्रसुतीसाठी या कुटुंबाचे समुपदेशन केले. त्यामुळे ही माता शासकीय रुग्णालयात दाखल झाली. मातेने बालिकेला जन्म दिला. मात्र, बाळाचे वजन फक्त 1 किलो 900 ग्रॅम इतकेच होते. त्यामुळे बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. माता व मातेचे नातेवाईक बाळाला तिथे ठेवण्यास तयार नव्हते व शेवटी त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी जरी सुट्टी घेतली तरीही त्या बाळाचे प्राण वाचविणे ही जबाबदारी ओळखून डॉ. पाटील यांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन समुपदेशन केले. बालकांचे संगोपन, दुध पाजण्याची पध्दती, आवश्यक स्वच्छता व काळजी याबाबत कुटुंबियांना माहिती दिली. बाळाला सुती कापडामध्ये कसे गुंडाळावे, याबाबतही मार्गदर्शन केले. दरम्यान, चौथ्या दिवशी बाळाची तपासणी करताना लघवीच्या ठिकाणी दुखरा अल्सर झाल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळाला ताप येणे साहजिक होते. त्यावर तत्काळ उपचार करण्यात आला. नवव्या दिवशी बाळाच्या तोंडात फोड आल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनास आले. त्यावरही तत्काळ उपचार केल्याने बाळ बरे झाले. योग्य समुपदेशन व काळजीमुळे त्याच्या वजनात वाढ होऊन आजघडीला बाळाचे वजन 2 किलो 400 ग्रॅम एवढे झाले आहे. बेड्यावर संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढण्यासाठी सातत्याने जनजागृती होत असल्याची माहिती आरोग्यसेविका विजया बारसे यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments