Home ताज्या घडामोडी बस स्थानकातील सुविधांची कामे तातडीने पूर्ण करा: बच्चू कडू

बस स्थानकातील सुविधांची कामे तातडीने पूर्ण करा: बच्चू कडू

अमरावती

अचलपूर एस. टी. बसस्थानक परिसरात आवश्यक सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिले. अचलपूर बस स्थानकाची पाहणी राजमंत्री श्री. कडू यांनी केली, तसेच अचलपूर व चांदूर बाजार येथील बसस्थानक परिसरातील कामांचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता शीतल गोंड, विभागीय अभियंता सुशांत पाटील, विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे, वास्तुशास्त्रज्ञ रवींद्र राजूरकर आदी उपस्थित होते राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, बस स्थानकात येणाऱ्यानागरिकांसाठी आवश्यक त्या सुविधांची उभारणी वेळेत करण्यात यावी. परिसरात गर्दी होऊन रहदारीची कोंडी होऊ नये, यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. बसेस सुटण्याची जागा, त्यांचे आत येण्याचे व बाहेर जाण्याचे मार्ग, प्रवाश्यांना येण्याजाण्याची जागा, इतर वाहनांसाठी पार्किंग आदींचे परिपूर्ण नियोजन करून त्यानुसार योग्य व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

अचलपूर व चांदूर बाजार बसस्थानकांतील विविध विकासकामांची माहिती त्यांनी विभाग नियंत्रक व अभियंत्यांकडून घेतली व नियोजित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments