Home ताज्या घडामोडी फळगळ रोखून संत्रा उत्पादन वाढण्यासाठीकृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत  : बच्चू कडू

फळगळ रोखून संत्रा उत्पादन वाढण्यासाठी
कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत  : बच्चू कडू

  अमरावती

संत्रा फळपीक जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे. संत्र्याची फळगळ थांबून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे व फळगळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कृषी संशोधकांनी चमू तयार करून गावे दत्तक घ्यावीत व शेतक-यांना परिपूर्ण मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज अचलपूर येथे केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी संशोधन केंद्रातर्फे अचलपूर येथे संत्रा फळगळ नियंत्रण व बीजोत्पादन कार्यशाळेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्षस्थानी होते. कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे उपस्थित होते.

   राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करुन वेळोवेळी त्यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यासाठी कृषी तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन संत्रा उत्पादक गटांना मार्गदर्शन करावे. या प्रक्रियेत सातत्य ठेवावे जेणेकरून शास्त्रीय उपाययोजनांतून संत्रा फळगळ नियंत्रित करता येईल. शेतकरी बांधवांनी गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन शेतीसंबंधी समस्या कृषी शास्त्रज्ञ, संशोधक किंवा कृषी अधिकारी यांच्यासमक्ष मांडाव्या. तज्ज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास संत्रा उत्पादन वाढीस चालना मिळेल. एखाद्या परिसरात पीक रोगाच्या संक्रमणाची माहिती मिळताच कृषी विभागाने त्यावर उपाययोजना सुचवितानाच इतर ठिकाणीही माहिती प्रसारित केली पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले. श्री. भाले म्हणाले, पिकांचे नियोजन, खतांचे व्यवस्थापन या तांत्रिक बाबींची माहिती संत्रा उत्पादकांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन व जनजागृतीसाठी यापुढेही तज्ज्ञांच्या मदतीने उपक्रम राबविण्यात येईल. श्री. गाडे, श्री. वानखडे यांचीही भाषणे झाली. संत्रा फळगळ रोखण्यासाठी मार्गदर्शनपर घडीपत्रिकेचे व केळी लागवडीचे व्यवस्थापनाबाबत माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी झाले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments