Home ताज्या घडामोडी केमिकल फॅक्टरीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही केली...

केमिकल फॅक्टरीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही केली पाहणी

अमरावती

येथील औद्योगिक वसाहतीतील नॅशनल पेस्टिसाईड अँड केमिकल्स या फॅक्टरीला काल मध्यरात्रीनंतर आग लागली. ही फॅक्टरी ऑक्सिजन प्लँटच्या बाजूला आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली. सर्व महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

उद्योग, कारखाने, इमारती यांचे फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. ती कार्यवाही मोहिम स्तरावर तत्काळ पूर्ण करावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व महत्वाच्या इमारतीचे फायर ऑडिट पूर्ण होणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिकेचे ६ व इतर शहरातील ५ असे एकूण ११ अग्निशमन वाहने व दलांकडून आग विझवण्यासाठी तातडीने पोहोचून प्रयत्न करण्यात येत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments