Home ताज्या घडामोडी डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती

डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून गतीने तपासणी करून रुग्णांना चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आज डेंग्यूच्या चाचणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, मनपा विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद भिसे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. मुक्ता देशमुख, तंत्रज्ञ अभिलाषा ठाकरे, डॉ. अर्चना निकम, डॉ. रंजना खोरगडे उपस्थित होते. प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणे आणि चाचणीसाठी लागणाऱ्या किटची माहिती श्रीमती ठाकूर यांनी जाणून घेतली. सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली असून अद्ययावत उपकरणांनी सज्ज आहे. तंत्रज्ञाच्या मदतीने चाचणी अहवाल तात्काळ देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments