Home धार्मिक दर्शन

दर्शन

मी कधी कधी संध्याकाळी घराजवळच्या साईबाबांच्या मंदिरात जातो. दर्शन घेतो आणि काही वेळ तिथल्या बाकावर बसून राहतो . तिथल्या शांततेचा अनुभव घेत!
काही लोक अगदी नित्यनेमाने इथे येतात . त्यापैकीच एक म्हणजे तिथे संध्याकाळी येणारे आजोबा !
वय अंदाजे सत्तरीकडे असावं . ते हळू हळू चालत येतात . आल्यावर पाय धुतात मग तिथल्या तुळशी वृन्दावानाला प्रदक्षिणा मारतात , मनोभावे नमस्कार करतात. प्रदक्षिणा मारतांना वृन्दावनाच्या प्रत्येक बाजूला हात लावून आशीर्वाद घेतात. नंतर तिथे असलेल्या नंदीला नमस्कार करतात, साईबाबांचे दर्शन घेतात , देवाला प्रदक्षिणा मारतात . हे अगदी संथपणे सुरु असते . प्रदक्षिणा झाल्यावर देवाला दोन्ही हात जोडून , डोळे मिटून नमस्कार करतात . मग तिथल्या ओट्यावर बसतात – देवाकडे बघत ,खूप वेळ!

एकदा असेच एक जोडपे तिथे आले . साधारण पन्नाशीच्या आसपास असावे . त्यांनी देवाचे दर्शन घेतले . काहीवेळ तिथल्या बाकावर बसून मग निघाले . निघतांना त्यांनी मला एक कार्ड दिलं – “मी पुजारी आहे – काही पूजेचं , सत्यनारायणाचं काम असल्यास सांगा . या कोरोना मुळे मागचे बरेच दिवस काही कुणी पूजेसाठी बोलवलं नाही . बघा , तुमच्या मित्रांमध्येही द्या हवं तर . ” त्यांनी अजून ५ कार्ड दिले . “या देवळात कोणी पुजारी आहे काहो? ” मी म्हणालो – “मला नक्की माहिती नाही . बाहेर तो फुलवला बसतो. त्याला माहिती असेल. तुम्ही त्याला विचारा. ”
“अच्छा , ठीक आहे .” असे म्हणून ते दोघं गेले.

परवा एक बाई तिच्या ४ मुलांनी घेऊन आली . एक कडेवर बाकी तीन तिच्या मागे मागे . त्यापैकि एक पोर रडत होतं . तिने त्याला एक गालावर ठेऊन दिली. त्याने भोकाड पसरले . हा कार्यक्रम होईपर्यंत ती एव्हाना तेथील एका बाकावर बसली होती .मुलांसाठी पर्स मधून काहीतरी खाऊ काढून रडके पोरं चूप केले. पोरं खाईपर्यंत ती उठली आणि देवळाच्याच आवारात असलेल्या स्वस्तिकाच्या झाडाचे काही पांढरे फ़ुलं तोडले आणि तिच्याजवळच्या पिशवीत ठेवले .मग पटकन देवासमोर जाऊन नमस्कार केला आणि झटपट मुलांना घेऊन गेलीही ! . हे चित्र फार वेगात पुढे गेल्यासारखं वाटलं .

मी कित्तेक दिवस या देवळात येत राहिलो आणि अजूनही येतो. अनेकदा अनेकांचे हात जुळतांना आणि पापणी पापणीला लागतांना बघतो.
मग कळते की खरी अद्भुत अगम्य गोष्ट तर त्या नंतर घडते . हात जोडल्यावर , डोळे मिटल्यावर !
जी गोष्ट त्या आजोबांना रोज यायला भाग पाडते , पुजाऱ्याला आस देऊन जाते , वेळात वेळ काढून अनेकांना इथे येण्याची ओढ लावते आणि मलाही… !

आदित्य जोशी

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments