Home ताज्या घडामोडी कुलगुरू अतिथी भव !

कुलगुरू अतिथी भव !

सात वर्ष झालीत आता पूर्ण. हो 2013 चा असाच ऑक्टोबर महिना होतो तो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर एनएसयुआयने कुलगुरुं विरोधात आंदोलन छेडले होते. एनएसयुआयचे त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या शिवराज मोरे या युवकाने उपोषणच सुरू केले होते. हे आंदोलन फार गाजले आणि तितकेच संत गाडगेबाबांच्या नावाने असणाऱ्या अमरावती विद्यापीठाला काळीमा फासणारे ठरले. त्यावेळी कुलगुरू असणारे डॉ. मोहन खेडकर यांनी बांधाबांध भत्त्याच्या नावाखाली विद्यापीठातून बेकायदेशीर रक्कम हडपली होती . तसाच प्रताप तत्कालीन कुलसचिवांनीही केला होता. एकूणच विद्यार्थी हितापेक्षा इतक्या मोठ्या पदावर पोचणारी ही विद्वान माणसं इतकी खुजी असणं हेच दुर्दैव. 2013 ला कुलगुरू पदावरील व्यक्ती बोगस असू शकतो याबाबत पानटपरीवाल्यांपासून पंचर जोडणाऱ्यांमध्येही चर्चेचा विषय होता. आज सात वर्षे उलटून गेल्यावरही या घटनेला उजाळा द्यावासा वाटला करण या 7 वर्षात केवळ कुलगुरू पदावरची व्यक्ती बदलली. विद्यापीठाची प्रतिमा मात्र आजही तशीच कायम आहे .

सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या मुलांना शिकवायचे आहे. मोठे करायचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीसह संपूर्ण वऱ्हाडत शिक्षणाचे महत्व केवळ पटवून सांगितले नाही तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अगदी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोचविली. आज मात्र शिक्षणाच्या नावावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचिंच चंगळ सुरू असल्याचे वास्तविक आणि दुर्दैवी चित्र आहे. कोरोना या भयावह संकटामुळे आजही अमरावती विद्यापीठ शिक्षण, परीक्षा, निकाल या बाबी सोडून इतर बाबतीत प्रगतीपथावर आहे हे पुन्हा एकदा उजेडात आले।
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांना केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बांधनकारक आहेत. आता या परीक्षा घेऊन 30 नोव्हेंबर पर्यंत निकालही विद्यपीठाच्या जाहीर करायचा आहे. आज 37 वर्ष विद्यापीठाच्या स्थापनेला झालीं असताना विद्यापीठांचे मूळ कर्तव्य असणाऱ्या परिक्षाच विद्यापीठ घेऊ शकत नाही याला काय म्हणावं. सामान्य विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षा घेते हे ठाऊक आहे. मात्र विद्यापीठ एखाद्या कंपनीला परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवित असेल तर विद्यापीठाने 37 वर्षात नेमके कुठले दिवे लावलेत हा प्रश्न तर विचारायलाच हवा. आणि हो कंपनी म्हणजे कोणती तर परिक्षा काय हेच ठाऊक नसणारी अशी ही कंपनी. नागपूर शहरात भाड्याच्या दोन खोलीत ऑफिस थाटायचं. पाच वर्षांसाठी पाहुणे म्हणून आलेल्या कुलगुरू, प्र- कुलगुरू,कुलसचिव, केंद्रीय मूल्यांकन मंडळ संचालकांना मॅनेज्ड करायचं.या कामात केवळ दलाली करायसाठी शिक्षण क्षेत्रात अवतरलेल्या आणि विद्यापीठ प्राधिकरणावर असणाऱ्या मोचक्या काही मंडळींना हाताशी धरून आपलं दुकान चालवायच अशी सर्कस करणारी ही कंपनी. विद्यार्थ्यांचा पैसा तर लुटायचे सोबत विद्याथ्यांचे भविष्य अंधारमय करणे हे अशा कंपनीचा उद्योग.आणि हा जो काही उद्योग सुरू आहे ना याचे भान कुणालाही नाही. डॉ. मोहन खेडकर कुलगुरू असताना माईंडलॉजिक कंपनीने विद्यापीठात घाण केली आता डॉ. मुरलीधर चांदेकर कुलगुरू असताना प्रोमार्क कंपनीने केलेल्या घाणीने विद्यापीठ घाण झाले आहे. खरं तर कोरोनामुळे या प्रोमार्क कंपनीचे पितळ उघडे पडले. कोरोना येताच विद्यापीठ सोडून 4 महिने नागपूरला आपल्या घरी आराम करणाऱ्या कुलगुरूंना अमरावती विद्यापीठ आणि येथील विद्यार्थ्यांची किती काळजी आहे हे लक्षात आले. कंपनीच्या भरवशावर असणारी विद्यापीठाची यंत्रणा परिक्षा घेण्यास अपयशी ठरल्याने आता परिक्षेची जबाबदारी महाविद्यालयांवर लादण्यात आली आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय अडचणींवर निश्चितच मात करून परीक्षा घेतील मात्रB पाच वर्षांसाठी अतिथी म्हणून आलेल्या कुलगुरूंच्या पाऊणचारावर नेमकं कोण बोलणार. 2013 ला कुलगुरू गो बॅक च्या घोषणा आजही कानात घुमतात आहेत. मात्र यापूर्वीच्या कुलगुरूंप्रमाणे आजच्या कुलगुरूंनाही कान नाहीत आणि भान पण नाहीच.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments