Home ताज्या घडामोडी व्यवसाय पाणीपुरीचा... 'क्लिक' मात्र कायम

व्यवसाय पाणीपुरीचा… ‘क्लिक’ मात्र कायम

कोरोनाने अनेकांच्या आतुष्यात होत्याचे नव्हते केले. तर अनेकांच्या आयुष्याची वाट पार बादलुनही टाकली. अशाच एका वाटेवरून दुसऱ्या वाटेकडे वळलेल्या शेखरची कहाणी तर हटकेच. होय शेखर जोशी हा युवक खांद्यावर कॅमेऱ्याची बॅग लटकवून सकाळ पासून रात्रीपर्यंत समोर जे दिसतं आहे ते सौंदर्य, दाहकता, नृत्य, अपघात, निसर्गातील कलाकृती, चालू घडामोडी डोळ्याजमोर जे जे काही दिसत ते आपल्यात कॅमेऱ्यात टिपण्यासाठी ते सगळं क्लिक करणारा हा युवक वृत्तपत्रात फोटोग्राफर म्हणून अमरावती शहर आणि जिल्ह्यात नामवंतच. आता लॉकडाऊनच्या काळात अमरावती शहराचा अतिशय बोलका शुकशुकाट शेखरने कॅमेऱ्यातून टिपला.अमरावती शहरातील अनेक वृत्तपत्रांनी शेखरच्या कॅमेऱ्यातून टिपलेली शांत , चिडीचूप अमरावतीच्या अप्रतिम चेहऱ्याला पूर्ण पानभर प्रसिद्धी दिली. ज्या वृत्तपत्रासाठी तो काम करायचा त्या वृत्तपत्राने आता आम्हाला फोटोग्राफर नको हे स्पष्ट सांगितले. अनेक पत्रकारांना नारळ मिळालं त्यात फोटोग्राफर असणाऱ्या शेखरचाही नंबर लागला. मात्र खचून न जाता बंद शहर, चालू घडामोडी कॅमेरात टिपणे सुरूच होते. खरं तर आता पैसे मिळत नव्हते. पोट भरत नव्हते. नांदुभाऊ जोशी हे शेखरच्या वडिलांचे अमरावती शहरातील रुख्मिणी नगर चौक येथील पाणीपुरीच्या व्यवसायातील फेमस नाव. लॉकडाऊमुळे त्यांची गाडी बंद असली तरी त्यांच्या पाणीपुरीचे शौकीन त्यांना घरपोच पाणीपुरी पोचविण्याची डिमांड करायला लागले. आता प्रेस फोटोग्राफर असणाऱ्या शेखरकडे वडिलांनी तयार केलेली पाणीपुरी आणि भेळ घरपोच पोचविण्याचे जबाबदारी आली. केवळ जबाबदारी नाही तर शेखरला वडिलांचा व्यवसाय आणखी जवळून पाहता आला. आपण काढलेल्या फोटोचे जितके लोक दिवाने आहेत त्यापेक्षा नांदुभाऊंनी गुपचूप साठी बनविलेल्या पाण्याच्या शौकिनांची सांख्य तर कैकपटीने मोठी असल्याचे शेखरच्या लक्षात यायला लागले. मग काय तुटपुंजे पैसे मिळणाऱ्या प्रेसफोटोग्राफरपेक्षा चटोऱ्या लोकांना भरपेट खाऊ घालून आपापले पोटही समाधानाने भरता येतं, हे ओळखुन पाणीपुरी व्यवस्यात शेखर उतरलाच.

कंवरनगर चौक लगत अंबिका नगर येथील गणपती मंदिराजवळ घरलागतच पाणीपुरीच्या व्यवसायचा श्रीगणेशा झाला. वडील नांदुभाऊ जोशी, आई वीणा जोशी, भाऊ भूषण, वहिनी राधिका यांची साथ मिळाली. फोटोग्राफीसाठी सतत बाहेर असणारा काका आता घराजवळच दिसतो याचा पुतण्या मीहितच्या डोळ्यातील आनंद शेखरला उर्मी देणारा ठरला..व्यवसाय सूरु झाला. आठ – पंधरा दिवसातच शेखरने पाणीपुरीसाठी हायजीन मशिन गुजरातमधून बनवून आणली. आता स्टीलच्या कोठीत असणाऱ्या गोड-तिखट पाण्यात हाताने पुरी बुडवून ग्राहकांच्या प्लेटमध्ये देण्याऐवजी ग्राहकांसमोर प्लेटमध्ये गुपचूप ठेवले जातात. ग्राहक आता या लगुपचूपमध्ये मशीनद्वारे गोड-तिखट हवे ते पाणी भरून पाणीपुरीचा आस्वाद घेत आहेत. पाणीपुरीसाठी ही अशी हायजेनिक मशीन आणणारा शेखर हा अमरावती शहरात पहिला व्यवसायिक ठरला आहे. आजपर्यंत कॅमेरावरचे क्लिक बटन दाबून रोजीरोटी शोधणारा शेखर छान टपोऱ्या गुपचुपवर क्लिक करून त्यात चणे, बटाटे भरून ग्राहकांना चवदार पाणी पाजतो आहे. आयुष्याच्या वळणावरील या नव्या क्लिकने स्वतःच्या आयुष्याचा एक नवा अलबम सजतो आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments