Home ताज्या घडामोडी 50 महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाची परीक्षा सुरु

50 महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाची परीक्षा सुरु

ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत प्राचार्यांना सूचन

अमरावती –
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 परीक्षा सुरु झाल्या असून आज जवळपास 50 महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या असून सर्व महाविद्यालये व प्राचार्यांचे सहकार्य प्राप्त होत असल्याचे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महाविद्यालय स्तरावर आयोजित असलेल्या परीक्षा विद्यर्थ्यांना सुद्धा सुलभ होत आहे. उद्या आणखी महाविद्यालये परीक्षा सुरु करीत असून 2 नोव्हेंबरपर्यंत सर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाशी तातडीने संपर्क साधावयाचा आहे, तशा सूचना यापूर्वी विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना सुद्धा दिलेल्या आहेत. काही विद्य्रथ्यांकडून निवेदन प्राप्त झाले असून बहुतेक महाविद्यालये विद्याथ्र्यांच्या परीक्षा घेण्याकरीता केवळ ऑफलाईन पद्धतीचा अवलंब करीत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आज सर्व प्राचार्य व केंद्राधिकारी यांना पत्र पाठवून विद्याथ्र्यांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने घेण्यात याव्या, अशा सूचना दिलेल्या आहेत. विद्यर्थ्यांनी सुद्धा याची नोंद घ्यावयाची असून ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी एका पद्धतीने परीक्षा देवू शकतील. बहि:शाल विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये त्यांचा विषय नाही, परंतु विद्यार्थ्यांचे ते परीक्षा केंद्र आहे, अशा महाविद्यालयांना विद्यापीठाकडून परीक्षेच्या एक तास अगोदर प्राचार्यांच्या ईमेलवर प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बहि:शाल विद्यार्थ्यांचे प्रमाणे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असून वेळापत्रकाची एक प्रत केंद्राधिकारी यांना सुद्धा पाठविण्यात येणार आहे. विद्यर्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एक्झामिनेशन टॅबमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ते त्यांनी डाऊनलोड करुन आपल्या दिलेल्या केंद्रावर परीक्षा द्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments