Home ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी - अँड यशोमती ठाकूर...

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी – अँड यशोमती ठाकूर यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई

अमरावती जिल्हयात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासह जिल्ह्यातील प्रलंबित विषयांबाबत आज महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते. अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणेबाबत शासन संवेदनशील असून लवकरच भरपाई देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासित केले.

 

अमरावती जिल्हयात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.
त्याचप्रमाणे, सन २०२०-२०२१ मध्ये जिल्हा वार्षिक आराखड्यामधील प्रस्तावित नवीन कामे सुरु करण्यासाठी शासनस्तरावर नव्याने आदेश करणे आवश्यक आहे, सन 2018-19 मधील फळ पिकांचे नुकसान भरपाईचे 102 कोटी अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाही. सदर प्रलंबित नुकसान भरपाईचे पैसे मिळावे, मार्च 2020 विधीमंडळ अधिवेशनात अमरावती जिल्ह्यासाठी नवीन प्रशासकीय इमारती मंजुर झाल्या आहेत, त्या इमारतीचे प्रशासकीय आदेश व निधी उपलब्ध करुन देण्यात यावेत, मेळघाटमधील पुनर्वसित गावांकरिता शासनाच्या धोरणातील पर्याय एक नुसार प्रत्येक व्यक्तीमागे 10 लाख रु. देण्यात येत आहे परंतु ज्या गावात पुनर्वसन करण्यात येते त्या ठिकाणी मुलभूत सुविधेसाठी कुठलेही अनुदान देण्यात येत नाही. वेळेवर सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे मेळघाटमधील पुनर्वसित झालेले कुटुंब परत मुळगावी (मेळघाटात) येतात. याकरिता पुनर्वसनसाठी मुलभूत सुविधा व इतर आवश्यक सुविधा करणे आवश्यक आहेत. जेणेकरुन पुनर्वसित कुटुंब परत येणार नाही, नगरपालिका प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तसेत सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई घरकुल आवास योजनेतील घरकुल पुर्ण झाल्यानंतरही त्यांचे अनुदान मिळालेले नाही. अनुदान उपलब्ध करण्याबाबत मागणी करण्यात आली. अमरावती जिल्हयातील वाळू लिलाव बंद असून अद्याप पर्यंत वाळू लिलाव न झाल्यामुळे नागपूर येथील कन्हान नदीतून वाळू आणावी लागते. त्यामुळे बांधकाम करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाची बांधकामे व घरकुलाची बांधकामे कामे पुर्ण होत नाही. अमरावती जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव करणेबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात याव्यात, अमरावती जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर आदेश काढण्याबाबत विनंती करण्यात आली.
अमरावती शहरातील ग्रामिण भागातील जुने बांधकाम असतील त्या ठीकाणी पोलीस क्वार्टर्स चे नवीन बांधकामे होण्याबाबत विनंती करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments