Home ताज्या घडामोडी 5 ते 12 नोव्हेंबर पर्यंत साजरा होणार पक्षी सप्ताह ; शासन निर्णय...

5 ते 12 नोव्हेंबर पर्यंत साजरा होणार पक्षी सप्ताह ; शासन निर्णय जाहीर

 

अमरावती

5 नोव्हेंबरला मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन आणि 12 नोव्हेंबरला पक्षी शास्त्राचे जनक डॉ. सलिम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात पक्षी सप्ताह साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात 27 ऑक्टोबरला राज्य शासनाच्या महसूल व वन मंत्रालयाच्या वतीने शासन निर्णय जाहीर केला आहे.

 

पक्षी साप्ताह दरम्यान पक्षांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी व त्यांचा अधिवास, पक्षांचे स्थलांतर, त्यांच्या अधिवासाचे सरंक्षण पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्यांविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी पक्षी छायाचित्र प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे.शालेय विद्यार्थ्यांकरीत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेतली
जाणार असून पक्षी संदर्भात कार्यशाळा, माहितीपट आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत.पानथळ, तलाव, धरणं, जंगल आदी ठिकाणी पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासह पक्षी गणना, अधिवास स्वच्छता, पक्षी अभ्यास कार्यकर्म घेतले जाणार आहेत.पक्षी अधिवास व त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जलसंपदा, कृषी, व पोलीस विभागाला या कार्यक्रमात सहभागी केले जाणार आहे. प्रधान वन संरक्षकांना या संपूर्ण सप्ताह बाबत सविस्तर सूचना त्यांच्या स्तरावर निर्गमित कराव्या लागणार असल्याचेही शासन आदेशात नमूद आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे पक्षी प्रेमीनच्या वतीने वनमंत्री संजय राठोड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments