Home मनोरंजन आंतरराष्ट्रीय अँनिमेशन दिन

आंतरराष्ट्रीय अँनिमेशन दिन

पॅरिसमध्ये 28 ऑक्टोबर 1892 या दिवशी ग्रेव्हीन म्युझियममध्ये चार्ल्स इमाईल रेनॉड्‌स यांच्या, जगातल्या पहिल्याच, अँनिमेशनपटाचे ऐतिहासिक प्रदर्शन झाले होते. द असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म्स द अॅनिमेशन’ म्हणजेच ‘असिफा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने २८ ऑक्‍टोबर हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्त जगभर विविध उपक्रम आयोजित केले जातात.

भारतात अँनिमेशन उद्योगाची सुरुवात १९५६ साली झाली. त्यावेळी भारत आणि अमेरिका दरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत वॉल्ट डिस्ने स्टुडीओचे क्‍लेअर विक्‍स यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हीजन्सचे कार्टून फिल्म युनिट सुरु झाले. सामाजिक संदेश देण्याकरिता अँनिमेशन कलेचा वापर फिल्म्स डिव्हीजन्सने मोठ्या प्रमाणात केला. भारतातील अँनिमेशन उद्योगाचे प्रवर्तक राम मोहन यांना सन २०१४ मध्ये प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. अमेरिकेतील विख्यात कार्टून स्टुडिओ वॉल्ट डिस्ने यांचे मोठे योगदान लाभल्याने हा उद्योग जगभर लोकप्रिय झाला. त्याव्यतिरिक्त जॉर्ज लुकास, जॉन लिसेस्टर, स्टीव जॉब्ज, स्टीव्हन स्पीलबर्ग यासारख्या प्रज्ञावान आणि प्रतिभावान दिग्गजांनी विविध प्रयोगाअंती पडद्यावर आभासी जग निर्माण केलं. अँनिमेशन तंत्र हाच त्यांचा प्रयोगाचा आत्मा होता. मूळ कल्पनाचित्रं रेखाटल्यावर, सिनेमा माध्यमातून पडद्यावर दृकश्राव्य परिणाम साधणे, हे काम भारतातही अनेक वर्षे केलं गेलं आहे.

‘एका निर्जिव रेखेला जिवंत करणं म्हणजे अँनिमेशन” अशी सर्वात सोपी साधी व सरळ व्याख्या करता येईल. ॲनिमेशनमध्ये
ऑनिमेटर म्हणून काम करताना तुमची स्वतःची कल्पना शक्ती ही वेगवेगळया सॉफ्टवेअरशी मैत्रीपूर्ण अभ्यासानेच साकार होत जाते.एका साध्या ‘निए’ला (POINT) घेऊन त्यास एका ठिकाणाहुन दुसऱ्या
ठिकाणी उडवत नेऊन ठेवणे यासाठी पूर्वी यूप मेहनत घ्यावी लागत होती. पण आता येत्या काही वर्षात काम्प्युटरयुगात विविध
सॉफ्टवेअरच्या मदतीने अँनिमेशन करता येते. कल्पनाशक्ति व पॅशन बरोबर ॲनिमेशन असे सूत्र आपण याविषयी म्हणू
शकतो. मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तिमान” या कॅरेक्टर भोवती फिरणा-या अॅनिमेशन सिरीयल्स्चा अनुभव मला खुप काही
शिकवून गेला आहे .असे परेश देशमुख
पूर्व ॲनिमेशन आर्टिस्ट अकोला. यांनी सांगितले.

प्रा. वंदना शिंगणे अकोला

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments