Home विदर्भ 'गुट' खा !

‘गुट’ खा !

हो, आहे राज्यात गुटखाबंदी. ठाऊक आहे. वर्षभरापूर्वी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतः अमरावती आले असताना अगदी खबरदार वगैरे शब्दात इशारा दिला होता. कुठेही दिसला तर कठोर कारवाई केली जाईल गुटखा असं काही बोलले होते ते. पण खरं सांगायचं म्हणजे या नेते लोकांना असं बोलावंच लागत ना. आता नेते बोललेच नाही तर कसं जमणार. आणि यांच्या बोलल्याने तुम्हा आम्हाला गुटख्याच्या पुड्या मिळणं थांबल्या का कुठे. त्यामुळे नेत्यांच्या आशा वक्त्यावयावर विश्वास ठरवायचा नाही आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष पण द्यायचं नाही. अरे आज अख्या गावाला माहिती आहे संपूर्ण विदर्भात आणि आणि थेट नाशिक पर्यन्त गुटखा आपल्या अमरावतीतून जातो ते. यात नवीन काही राहिलं नाही. मागे आठवतं का लोकसभा निवडणूक जवळ आल्या तसा गुटखा बंद झाला होता.हा आठवतं ना पाच सहा महिने गुटकाच नव्हता. पण यामुळे बिचाऱ्या गुटकावल्याचे नुकसान झाले असे वाटून घ्यायचे नाही फायद्यातच होता तो. निवडणूक जवळ आल्या होत्या ना. आता व्हाइट कॉलर नेत्यांसह हवशे गावशे नेतेही डिमांड करू लागले. आता चार- पाच खोके कसे बसे ऍडजस्ट करतो हो माणूस पण विषय 15, 20 च्या वर जात असेल तर दुकान बंद केलेलं बरं ना. त्यामुळेच सरकारने बॅन केलेला गुटका पाच – सहा महिने आपल्या इथेपण बॅन असल्यासारखाच होता ना.

आता मात्र सारं आलबेल आहे. पानटपरी, किराणा दुकान, हॉटेल वाट्टेल तिथे मिळते ना पुडी बस. आता ज्या विभागावर कारवाई वगैरे करायची जाबाबदरी आहे त्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्षातूम दोन-चार पान टपऱ्यांवर कारवाई करून कर्तव्य बजावतातना झालं. आता गुटख्याच्या डॉन ला हात पकडायची हिम्मत तरी कशी होईल त्यांची. जे कोणी असो ज्यांच्यावर कारवाई करण्याची काबाबदरी त्यांची दिवाळी पहा कशी मस्त होते. नेत्यांची तर दर महिन्यातच दिवाळी आहे म्हणतात. गुटकेलेल्या डॉन साहेबांचा दारात इतका की गल्लीबोळ्यातील काही नगरसेवकापसून थेट केंद्रीय मंत्र्यांच्या मांडिलां मंडी लावून बसू शकतात इतकी मोठी उंची गाठली त्यांनी. शेवटी ‘उचे लॉग उचे संबंध’ . गुटखा खाल्ल्याळणे कॅन्सर होतो, अमुक होतो, ढमूक होतो, माणूस मारतो अशा जाहिरातींवर मार खर्च होतो. सब फालतुपणा.
खरं तर हा फालतू विषय चघळण्यात अर्थ नाही. त्यांना ‘गुट’ खाऊ’ द्या गुटखा खाऊन मारणाऱ्यांना मरु द्या.आपण हा विषय पचकन थुंकून मोकळा केलेलाच बरा .

 

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments