Home ताज्या घडामोडी शिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपये

शिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपये

अमरावती,

शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत पाच रुपये एवढा करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. नागरिकांच्या हिताची जोपासना व विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा केंद्रांची सुविधा देण्यासह गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळीचे दरही कमी करण्यात आले. जानेवारी 2020 पासून 10 रुपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. कोरोना साथीमुळे मार्चपासून या थाळीची किंमत 5 रुपये एवढी करण्यात आली. गरजू व गरीब नागरिकांसाठी शिवभोजन थाळी ही आधार ठरली आहे. सुरुवातीला जिल्हा मुख्यालयी सुरू झालेल्या या योजनेचा नंतर विस्तार करण्यात आला. आता ती तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 22 केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्यात साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

शिवभोजन थाळीकरिता शासनाने निश्चित केलेली किंमत शहरी भागात 50 रुपये प्रति थाळी आहे, तर ग्रामीण भागात ती 35 रुपये इतकी आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यापासून दर कमी करण्यात आले. आता प्रत्येक ग्राहकाकडून थाळीपोटी केवळ 5 रुपये आकारले जातात. त्याव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून केंद्रचालकाला देण्यात येते. शहरी भागात अनुदानाची ही रक्कम 45 तर ग्रामीण भागात 30 रुपये इतकी आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments