Home ताज्या घडामोडी महाराष्ट्रात ५ हजार ९०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, ९१ मृत्यू

महाराष्ट्रात ५ हजार ९०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, ९१ मृत्यू

मुंबई

महाराष्ट्रात आज ७ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ९४ हजार ८०९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४३ हजार ७१० रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८८ लाख ३७ हजार १३३ नमुन्यांपैकी १६ लाख ६६ हजार ६६८ (१८.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३३ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १२ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख २७ हजार ६०३ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती, तर कोरोनाची भीतीही वाढत होती. पण, मागील सोळा दिवसात कोरोनाचा कहर कमी होत चालला आहे. मागील ९ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या १८ ते २४ हजाराहून थेट ५ ते ८ हजारांवर आली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments