Home ताज्या घडामोडी यशोमती ठाकुरांच्या राजीनामा द्या ; भाजपचे बेमुदत ठिय्या आंदोलन

यशोमती ठाकुरांच्या राजीनामा द्या ; भाजपचे बेमुदत ठिय्या आंदोलन

अमरावती –

2012 मध्ये आमदार असताना पोलीस शिपायाला मारहाण केल्या प्रकरणात न्यायायलयाने दोषी ठरविले आहेत. यामुळे आता यशोमती ठाकूर यांनी मंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा द्यावा. या मागणीसाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

गांधी चौक परिसरात एकेरी मार्ग असताना यशोमती ठाकूर यांचे वाहन घुसल्याने वाहतूक पोलीस शिपाई विलास वराळे यांनी हटकले असताना त्यांना यशोमती ठाकूर आणि त्यांच्या वाहनातील दोघांनी मारहाण केली होती. या प्रकरणात यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 ऑक्टोबरला दोषी ठरविले. न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपने यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असताना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात बेमुदत साखळी आंदोलन करण्यात आले आहे.

यशोमती ठाकूर स्वतः राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी यशोमाती ठाकूर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी भाजपने केली आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments