Home ताज्या घडामोडी पत्नीच्या अंगातील भूत उतरविण्यासाठी पतीने बोलाविला मांत्रिक ; महिलेच्या...

पत्नीच्या अंगातील भूत उतरविण्यासाठी पतीने बोलाविला मांत्रिक ; महिलेच्या तक्रारीवरून पती आणि मांत्रिक अटकेत

अमरावती-
विवाहितेवर जादूटोणा करणाऱ्या एका मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. विवाहितेच्या अंगात शिरलेला भूत बाहेर काढण्यासाठी तिच्या पतीने या मांत्रिकाला घरात आणले होते. विवाहितेने विरोध केला असता तिच्या पतीच्या मदतीने मांत्रिकाने तिच्या संपूर्ण अंगाला हळद फासली होती. या प्रकाराने हादरलेल्या विवाहितेने पती आणि मांत्रिकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजू गुढडे असे अटक करण्यात आलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. शहरातील महादेवखोरी परिसरात राहणारा एक व्यक्ती या मांत्रिकाला भेटला होता. त्याने, माझ्या पत्नीच्या अंगात भूत आहे, ते बाहेर काढून दे, असे मांत्रिकास सांगितले होते. त्यानुसार काल रात्री मांत्रिक त्या व्यक्तीसह त्याच्या घरी पोहोचला. यावेळी मांत्रिकाने त्या व्यक्तीच्या लहान मुलीस हळदीचे पाकीट आणण्यास सांगितले. यानंतर मुलीला घराबाहेर काढून मांत्रिकाने लिंबू वगैरे काढून पूजेला सुरुवात केली. पूजेदरम्यान मांत्रिकाने महिलेच्या अंगाला हळद फासायला सुरुवात करताच महिलेने मांत्रिकास विरोध केला. दरम्यान, पतीच्या मदतीने मांत्रिकाने महिलेला हळद फासली.

या संपूर्ण प्रकारामुळे हादरलेल्या महिलेने काल रात्री फ्रेजारपुरा पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस तातडीने महादेव खोरी परिसरात पोहोचले. त्या महिलेच्या घराची पाहणी करून तिथे हळदीसह, लिंबू आणि जादू टोण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करून पीडित महिलेच्या पतीसह मांत्रिक राजू गुढडे यास अटक केली. पोलिसांनी या दोघांवरही जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना आज जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजार केले होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे महादेव खोरी परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments