Home ताज्या घडामोडी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

अमरावती
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आज ५२ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गुरुकुंज मोझरी येथील महासमाधीवर महोत्सवाचे आयोजित करण्यात आला असून पहाटे साडे चार वाजता तीर्थ स्थापनेने महोत्सवाला प्रारंभ झाला. मोजकेच गुरुदेव भक्त यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, पुण्यतिथी महोत्सवाला भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन गुरूदेव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तुकडोजी महाराजांची कर्मभूमी  असलेल्या गुरुकुंज मोझरीतील समाधीपरिसर आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी देश विदेशातून लाखोगुरुदेव भक्त येत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० गुरुदेवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे. दरम्यान गुरुदेवभक्तांनी घरूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने केले आहे.तुकडोजी महाराजांच्या
पुण्यतिथीचा कार्यक्रम हा दरवर्षी विद्यामंदिराच्या प्रांगणात पार पडत असतो. यंदा मात्र, समाधीस्थळावर हा सोहळा आयोजित करण्यात आहे. ६ नोव्हेंबरला गोपाळकाल्याने राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप होईल.  आठ दिवसाच्या पुण्यतिथी  महोत्सवामध्ये दरवर्षी विविध ला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात यंदा मात्र साधेपणाने कार्यक्रम
साजरा केल्या जाणार आहे.

 

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments